r ashwin thanked ms dhoni for giving him oppurtunity to bowl new ball in ipl 2024 ashwin recalls the moment  yandex
Sports

R Ashwin On Ms Dhoni: 'मी आयुष्यभर धोनीचा ऋणी राहीन...' आर अश्विन असं का म्हणाला?

R Ashwin Statement : आयपीएल २०११ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने दाखवलेला विश्वास भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन अजूनही विसरलेला नाही.

Ankush Dhavre

R Ashwin On MS Dhoni:

आयपीएल २०११ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने दाखवलेला विश्वास भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन अजूनही विसरलेला नाही. अश्विनने एमएस धोनीचे खुप कौतुक केले आहे. माझं क्रिकेट करियर बहरण्यासाठी एमएसचा मोठा वाटा आहे. त्याने माझ्यासाठी केलेली गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही, मी एमएसचा आयुष्यभर ऋणी राहीन, असं आर आश्विन म्हणाला.

नुकताच झालेल्या इंगलंडविरुद्धच्या कसोटीमध्ये अश्विनने १०० कसोटी सामन्यांचा टप्पा गाठला. या सामन्यात त्याने ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला. त्याच्या या यशामुळे तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून त्याचा १ कोटी रुपये देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात बोलताना त्याने एमएस धोनी बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अश्विन म्हणाला,'मी सहसा माझ्या भावना व्यक्त करत नाही. माझा सत्कार केल्याबद्दल मी खरंच आभारी आहे. २००८ मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ड्रेसिंगरूममध्ये एमएस आणि माझी भेट झाली. त्यावेळी माझी कामगिरी चांगली नसल्याने मला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं नव्हतं. २०११ मध्ये झालेल्या आयपीएल फायनलमध्ये धोनीने माझ्या हातात नवीन चेंडू सोपवला. त्यावेळी ख्रिस गेल फलंदाजीला होता. ख्रिस गेल तेव्हा तुफान फॉर्ममध्ये होता. धोनीने माझ्यावर विश्वास दाखवला. त्याचा विश्वास मी सार्थ ठरवला. त्याला मी शू्न्यावर बाद करत ३ गडी बाद केले. तो सामना आणि ती रात्र आम्हा सर्वांसाठीच अविस्मरणीय होती' (Cricket news in marathi)

आयपीएल २०११ च्या फायनलनंतर अश्विनच्या कारकिर्दीला खरी दिशा मिळाली होती. आर अश्विनल टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आली नाही. मात्र कसोटीत त्याने आपला ठसा उमटवला. त्याने १०० कसोटी सामने खेळत ५०० हून अधिक गडी बाद केले आहेत. कसोटीत अनिल कुंबळेनंतर सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा आर अश्विनच्या नावावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT