ravindra jadeja with r ashwin  saam tv
क्रीडा

IND vs WI 2nd Test: ही दोस्ती तुटायची नाय!अश्विन - जडेजाच्या नावे खास विक्रमाची नोंद

Ankush Dhavre

R Ashwin- Ravindra Jadeja Record In Test: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादच्या मैदानावर सुरु आहे. भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान दिले आहे.

चौथ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत वेस्टइंडीज संघाने २ गडी बाद ७६ धावा केल्या आहेत. वेस्टइंडीजचा संघ विजयापासून अजूनही २८९ धावा दूर आहेत.

दरम्यान या डावात भारतीय संघाकडून आर अश्विन आणि रविंद्र जडेजाच्या जोडीने असा काही कारनामा करून दाखवला आहे, जो भल्या भल्या गोलंदाजांना करता आला नाही.

अश्विन- जडेजाच्या जोडीचा दिग्गज गोलंदाजांच्या यादीत प्रवेश..

आर अश्विन आणि रविंद्र जडेजाच्या जोडीने दिग्गज मोठा कारनामा करून दाखवला आहे. या जोडीने कसोटी क्रिकेट खेळताना ५०० पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.

असा कारनामा करणारी ही भारतीय संघाची दुसरी जोडी ठरली आहे. यापूर्वी हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांच्या जोडीने हा कारनामा केला होता. (Latest sports updates)

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या जोड्या..

हरभजन सिंग (२८१)- अनिल कुंबळे (२२०) - ५०१

आर अश्विन (२७४)रविंद्र जडेजा(२२६) -५००*

बिशन सिंग बेदी (१८४)-बीएस चंद्रशेखर(१८४) -३६८

भारतीय संघाचा दुसरा डाव..

वेस्टइंडीजचा पहिला डाव २५५ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघाला मोठी आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १८१ धावांवर डाव घोषित केला आहे.

या डावात भारतीय संघाकडून ईशान किशनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने नाबाद ५२ धावांची खेळी केली. तर शुबमन गिल २९ धावांवर नाबाद होता.भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे.

वेस्टइंडीजची विजयाच्या दिशेने वाटचाल..

वेस्टइंडीज संघाने चौथ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत २ गडी बाद ७६ धावा केल्या आहेत. तेगनारायण चंद्रपॉल २४ तर ब्लॅकवूड २० धावांवर नाबाद आहे. तर क्रेग ब्रेथवेट २८ आणि मॅकेन्जी खाते ही न खोलता माघारी परतला आहे. भारतीय संघाकडून आर अश्विनने २ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

SCROLL FOR NEXT