r ashwin with ravindra jadeja google
Sports

IND vs SA: जडेजा की अश्विन; दुसऱ्या कसोटीत कोणाला मिळणार स्थान? दिग्गज खेळाडूने सांगितलं नाव

Team India Playing XI Prediction : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांचा थरार सुरू आहे.

Ankush Dhavre

Irfan Pathan Playing 11 Prediction:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांचा थरार सुरू आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा १ डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. तर दुसरा सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जाईल.

या सामन्यासाठी आर अश्विन - रविंद्र जडेजाला संधी मिळेल का? की दोघांनाही संधी मिळेल? याचं उत्तर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने दिलं आहे.

या प्रश्नाचं उत्तर देत रविंद्र जडेजा म्हणाला की, ' जर रविंद्र जडेजा फिट असेल तर त्याला संधी मिळायला हवी. अश्विननेही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मात्र याप्रकारच्या खेळपट्टीवर रविंद्र जडेजा फायदेशीर ठरू शकतो. सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी रविंद्र जडेजा बेस्ट ऑप्शन आहे.'

पहिल्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली गेली होती. मात्र या सामन्यात तो हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. या सामन्यात त्याने १९ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याला केवळ १ गडी बाद करता आला. त्याच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ९३ धावा कुटल्या. या कामगिरीनंतर त्याच्यावर टीका देखील केली गेली.

प्रसिद्ध कृष्णाबाबत बोलताना इरफान पठाण म्हणाला की, ' जर केपटाऊन कसोटीत प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार नसेल. तर त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळायला हवी.' दुसरा कसोटी सामना येत्या ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. (Latest sports updates)

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव..

भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. या डावात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावा केल्या होत्या. यासह ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली होती. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला १३१ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि ३२ धावांनी गमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinchpoklicha Raja: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा जल्लोषात; गणेशभक्तांची मोठी गर्दी; पाहा बाप्पाची पहिली झलक

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; महिला नेत्याकडून राजीनामा, राष्ट्रवादी अजित पवारांची देणार साथ

Julali Gaath Ga: सावी घरच्यांचा विरोध पत्करून करणार धैर्यसोबत लग्न; 'जुळली गाठ गं' मालिकेत अखेर सावी-धैर्यची जुळली सात जन्माची गाठ

Jai Vilas Palace History: ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेस भव्य राजवाड्याचा इतिहास जाणून घ्या

Post-meal sugar cravings: जेवणानंतर गोड खात असाल तर 'या' समस्या लागतील मागे

SCROLL FOR NEXT