r ashwin twitter
Sports

IND vs BAN: पापा कहते है,बडा नाम करेगा...सामनावीर पुरस्कार मिळताच अश्विनची वडिलांना प्यारवाली झप्पी - PHOTO

R Ashwin Hugged His Father: भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनला सामनावीर पुरस्कार मिळताच त्याने वडिलांना प्यारवाली झप्पी दिली आहे.

Ankush Dhavre

IND vs BAN, 1st Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी ५१५ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं.

मात्र बांगलादेशचे फलंदाज आर अश्विनच्या फिरकीसमोर टिकू शकले नाहीत. पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ६ गडी बाद केले. दरम्यान या सामन्यानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आर अश्विनची शानदार कामगिरी

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघातील प्रमुख फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर अश्विनने मोर्चा सांभाळला. त्याने रविंद्र जडेजासोबत मिळून १९९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने ३७६ धावांपर्यंत मजल मारली. या डावात त्याने फलंदाजीत १०८ धावा केल्या. तर गोलंदाजीत त्याला पहिल्या डावात एकही गडी बाद करता आला नव्हता.

आर अश्विनची शानदार गोलंदाजी

पहिल्या डावात अश्विनला एकही गडी बाद करता आला नव्हता. मात्र दुसऱ्या डावात त्याने दमदार कमबॅक केलं. त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना बांगलादेशच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. ६ गडी बाद आणि फलंदाजीत १०८ धावा केल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दरम्यान हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अश्विनने आपल्या वडिलांनी मिठी मारली. त्याचे वडील त्याला सपोर्ट करण्यासाठी चारही दिवस स्टेडियममध्ये उपस्थित होते. आपला मुलगा लोकल क्राऊड समोर खेळतोय, हे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना झाला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून आर अश्विनने १०८ आणि रविंद्र जडेजाने ८६ धावांची खेळी करत, भारतीय संघाला ३७६ धावांपर्यंत पोहोचवलं.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा डाव अवघ्या १४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २३४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 'आजोबांचा नादच नाय', आरती सुरू असताना केला भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटधरून हसाल

विरोधकांशी ना चर्चा, ना वाद, थेट मंजुरी! नवीन आयकर कायद्यासह १९ विधेयके अधिवेशनात मंजूर

Pumpkin Gharge Recipe: टम्म फुगणारे भोपळ्याचे घारघे घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Love Crime : प्रेमाला नकार, दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवलं

Bail Pola Festival : बुलढाण्यात पोळा सणावर निर्बंध; लंपीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, शेतकऱ्यांची मात्र नाराजी

SCROLL FOR NEXT