R ASHWIN twitter
Sports

R Ashwin Record: अश्विन अण्णा रॉक्स! कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेल्या रेकॉर्डवर कोरलं नाव

IND vs BAN, 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत आर अश्विनने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Ankush Dhavre

R Ashwin Record In Test Cricket: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात लोकल बॉय आर अश्विन चमकला. आधी मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर अश्विनने शानदार शतक झळकावलं.

त्यानंतर संघाला गरज असताना अश्विनने पंचक घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान ५ विकेट घेताच अश्विनच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विनला एकही गडी बाद करता आला नव्हता. मात्र दुसऱ्या डावात त्याने शानदार कमबॅक केलं आणि २१ षटकात ८८ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. यासह तो कसोटीत भारतीय संघासाठी ५ गडी बाद करणारा सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावात शतक

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना आर अश्विनने शानदार शतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ६ गडी बाद केले. यासह त्याने चौथ्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतर गोलंदाजीत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. या रेकॉर्डमध्ये आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बॉथम अव्वल स्थानी आहे.

आर अश्विनने हा कारनामा ४ वेळेस करुन दाखवला आहे. तर इयान बॉथम यांनी हा कारनामा ५ वेळेस केला होता. तर वेस्टइंडीजचे माजी खेळाडू गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक कॅलिस, शाकिब अल हसन आणि रविंद्र जडेजा यांनी हा कारनामा २-२ वेळेस करुन दाखवला आहे.

भारताचा शानदार विजय

या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २३४ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, आर अश्विनने सर्वाधिक ६ गडी बाद केले. रविंद्र जडेजाने ३ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

90 हजार कोटी रुपयांची बिले थकीत; कंत्राटदारांचा संताप; नाशिकमध्ये तीन दिवसीय आंदोलनाला सुरुवात|VIDEO

Alum For Skin Care: त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुरटी फायदेशीर

Gia Manek Wedding: प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या ३९ व्या वर्षी थाटला संसार; बॉयफ्रेंडसोबत गुपचुप केलं लग्न

GST Tax Reforms: मोठी बातमी! १२, २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द, जीएसटी प्रणालीतील बदलाच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल

Maharashtra Live News Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मुठा नदीचं रौद्र रूप

SCROLL FOR NEXT