pv sindhu, tai tzu ying,  saam tv
Sports

Malaysia Masters 2022 : तई त्झु यिंग आजही ठरली सिंधूवर भारी; नाेंदविला १७ वा विजय

आजच्या सामन्यात सिंधूने यिंगला उत्तम लढत दिली मात्र तिला यश मिळाले नाही.

Siddharth Latkar

क्वालालंपूर : मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन (Malaysia Masters 2022) तई त्झु यिंगने (tai tzu ying) आज तिची प्रतिस्पर्धी पीव्ही सिंधूचा (pv sindhu) उपांत्यपुर्व फेरीत पराभव केला. सिंधूने आजच्या सामन्यात (sports) उत्तम लढत दिली. मात्र तिला यश (victory) लाभले नाही. तई त्झु यिंगकडून आजचा सिंधूचा हा 17 वा पराभव ठरला आहे. (pv sindhu latest marathi news)

या सामन्याच्या प्रारंभपासून यिंगने आक्रमक खेळ केला. तिने पहिला सेट (13-21) असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने काैशल्यपणास लावत यिंगवर (21-12) अशी मात केली. तिसरा म्हणजेच अखेरचा सेट चूरशीचा हाेईल असे वाटले हाेते मात्र यिंगने हा सेट (21-14) असा जिंकला.

आजच्या सामन्यात तई त्झु यिंगने सिंधूचा (21-13, 12-21, 21-12) असा 55 मिनीटांत पराभव केला. या महिन्याच्या प्रारंभी देखील सिंधूला ताई त्झू यिंगने मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले हाेते.

तई त्झु यिंगच्या विरुद्ध सिंधू सन 2019 पासून एकही सामना जिंकलेली नाही. तिचा हा 17 पराभव मानला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, OBC प्रमाणे ८ योजनांचा मिळणार लाभ

Saturday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींवर शनि देवाची कृपा असणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: संगमनेरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट; घरांचे पत्रे उडाले, नागरिकांचे मोठे नुकसान

Shivrajyabhishek Sohala Raigad: शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू; हजारो शिवभक्त रायगडावर दाखल

Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT