gujarat titans
gujarat titans  saam tv
क्रीडा | IPL

IPL 2023 Purple Cap List: राशिदच्या हातून Purple Cap निसटली, 'या' डॅशिंग भारतीय खेळाडूने केला कब्जा

Ankush Dhavre

Purple Cap List: आयपीएल २०२३ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. तर दिल्ली आणि हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे. आता ७ संघांमध्ये प्लेऑफमध्ये जाण्याची स्पर्धा रंगली आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ३४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केली. या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या यादीत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

राशिद खानच्या हातून पर्पल कॅप निसटली..

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स सामना होण्यापूर्वी राशिद खान हा पर्पल कॅपचा मानकरी होता. मात्र हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहमद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली. यासह तो आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने राशिद खानला मागे सोडत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.

मोहम्मद शमीने पटकावली पर्पल कॅप..

आयपीएल २०२३ स्पर्धेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जोरदार कामगिरी केली आहे. या गोलंदाजाने १३ सामन्यांमध्ये २३ गडी बाद केले आहेत.

राशिद खान आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २३-२३ सामने खेळले आहेत. मोहम्मद शमीने आतापर्यंत ३८५ धावा खर्च केल्या आहेत. तर राशिद खानने ४१४ धावा खर्च केल्या आहेत.

हेच कारण आहे की, २३-२३ विकेट्स असुनही, पर्पल कॅप मोहम्मद शमीला मिळाली आहे. फिरकी गोलंदाज युझवेन्द्र चहल २१ गडी बाद करत तिसऱ्या स्थानी आहे. १९ गडी बाद करणारा पियुष चावला या यादीत चौथ्या स्थानी आहे.

तर कोलकाता नाईट रायडर्स संघाता फिरकीपटू वरुण चक्रवर्ती १९ गडी बाद करत या यादीत पाचव्या स्थानी आहे. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

मोहम्मद शमी- २३

राशिद खान- २३ गडी

युजवेंन्द्र चहल- २१ गडी

पियूष चावला- १९ गडी

वरुण चक्रवर्ती- १९ गडी

तुषार देशपांडे- १९ गडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT