PBKS Vs MI : पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या लढतीमध्ये पंजाबचा विजय झाला आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. या विजयामुळे पंजाबचा संघ क्वालिफायर १ सामन्यासाठी पात्र ठरल्याचे निश्चित झाले आहे. याशिवाय पंजाबचा संघ १९ गुणांसह पॉईंट्स टेबलवर अव्वल स्थानी गेला आहे.
क्वालिफायर १ साठी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमने-सामने आले. पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरले. २० ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने सात विकेट्स गमावत १८४ धावा केल्या.
सलामीसाठी आलेल्या रायन रिकेल्टन (२७ धावा) आणि रोहित शर्मा (२४ धावा) यांनी मुंबईला सुरुवात करुन दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमावर आलेल्या सूर्यकुमार यादवने अर्धशतकीय खेळी केली. तिलक वर्मा फक्त १ धाव करुन माघारी परतला. हार्दिक पंड्या (२६ धावा) आणि नमन धीर (२० धावा) यांच्या साथीने सूर्याने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने ५७ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाख आणि मार्को यान्सिन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. अर्शदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केल्याने मुंबईचा डाव १८४ धावांवर संपला.
१८५ धावांचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर मैदानात आले. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह यांनी चांगली सुरुवात केली. बुमराहने प्रभसिमरनला बाद करुन माघारी पाठवले. प्रियांश आर्या (६२ धावा) आणि जोश इंग्लिस (७३ धावा) यांनी चांगली भागीदारी केली. सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांवर पंजाबचे फलंदाज वरचढ ठरले. सुरुवातीला मुंबईच्या बाजूने सामना जाईल असे वाटत असताना पारडे पंजाबच्या दिशेने वळले. पंजाबच्या फलंदाजांना मुंबईला रोखता आले नाही. शेवटी कर्णधार श्रेयस अय्यरने विजयी शॉट मारला.
मुंबईच्या बाजूने अनेक चुका झाल्या. फलंदाजीत सूर्यावर सगळा भार येत असल्याचे पाहायला मिळते. सुरुवात चांगली होत असून लवकर विकेट्स पडल्या. तिलक वर्मा मागील काही सामन्यांपासून आउट ऑफ फॉर्म आहे. गोलंदाजीमध्ये बोल्टने आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्याला विकेट्स घेत पंजाबला रोखणे जमले नाही. सँटनरने ४१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. बुमराहने एक विकेट घेतली. या दोघांव्यतिरिक्त अन्य गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.