Punjab Kings Glenn Maxwell 
Sports

IPL 2025: पंजाबसाठी वाईट बातमी, 'या' ऑलराउंडर खेळाडूची IPLमधून एक्झिट, PSLनेही वाढवलं संघाचं टेन्शन

Punjab Kings Glenn Maxwell : सीएसकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पंजाब किंग्सच्या संघाला एक वाईट बातमी मिळालीय. ज्यामध्ये त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीमुळे आयपीएलच्या बाहेर गेलाय.

Bharat Jadhav

लॉकी फर्ग्युसननंतर आता ग्लेन मॅक्सवेलही दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडलाय. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यावेळी पंजाब किंग्सचा अष्टपैलू मॅक्सवेल दुखापतग्रस्त झाला होता. त्या सामन्यात तो सात धावा काढून बाद झाला होता. आता तो आयपीएलमधून बाहेर पडलाय. त्यात पंजाबच्या संघाला त्याची रिप्लेसमेंट मिळेना झालंय. त्याचं कारण ठरलं, पीसीएल. पीसीएलमुळे पंजाबला चांगला दर्जेदार खेळाडू मिळत नाहीये.

आयपीएल २०२५ ची स्पर्धा रोमांचक स्थितीत आलीय. ज्यामध्ये १० पैकी ९ संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत. यामध्ये एक नाव म्हणजे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाब किंग्ज संघ. या संघाने आतापर्यंत १० पैकी ६ सामने जिंकलेत. तर पॉइंट्स टेबलवर हा संघ दुसऱ्या स्थानी आहे. त्याचदरम्यान पंजाबला मोठा धक्का बसलाय. याच कारण म्हणजे ऑलराउंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमधून बाहेर गेलाय.

हाताच्या बोटाला जखम झाली

पंजाब किंग्स संघाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमधून बाहेर पडत असल्याची माहिती दिली. पण मॅक्सवेलच्या जागी कोणता खेळाडू संघात येणार याची घोषणा अद्याप करण्यात आलीय. पण ग्लेन मॅक्सवेलचा पर्याय शोधण्यात येणाऱ्या अडचणींमागे पाकिस्तान सुपर लीग असल्याचं कारण मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी दिलंय.

दरम्यान पंजाब किंग्सने केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, बोटाच्या फ्रॅक्चरमुळे मॅक्सवेल या हंगामातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर असणार आहे. तो लवकर चांगला व्हावा, अशा शुभेच्छा संघाने दिल्या आहेत. पंजाबच्या संघाने मॅक्सवेलला ४.२ कोटी रुपयात खरेदी केलं होतं.

आयपीएल २०२५ च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी खूपच साधरण राहिलीय. यात त्याने ६ डावांमध्ये ८ च्या सरासरीने फक्त ४८ धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट ९७.९५ होता. गोलंदाजीत मॅक्सवेलने सहा डावात २७.५ च्या सरासरीने चार विकेट्स घेतल्या. मॅक्सवेलला त्याच्या खराब कामगिरीमुळे अनेक माजी खेळाडूंकडून टीकेचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जचा संघ सध्या आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये १० सामन्यांतून १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये त्यांचा पुढील सामना ४ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शुक्ल पक्षाची सुरूवात आजपासून; ग्रहस्थिती चार राशींवर होणार मेहरबान

Shocking: बंद खोलीत नेलं अन् कपडे काढले, संपूर्ण शरीरावर लिंबू लावलं नंतर...; मांत्रिकाचं मुलीसोबत भयंकर कृत्य

Grah Gochar: डिसेंबरमध्ये ५ ग्रहांची चाल बदलणार; पुढच्या महिन्यापासून या राशींची भरणार तिजोरी, मोठं यश मिळणार

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! वडाळ्यावरुन थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी

SCROLL FOR NEXT