Punjab Kings playoff qualification scenario IPL 2026 
Sports

IPL 2006: राजा की रंक! पंजाब किंग्ससमोर 'करो की मरो'ची स्थिती; जाणून घ्या प्लेऑफचं संपूर्ण समीकरण

IPL 2006 Punjab Kings Playoff Scenerio : पंजाब किंग्सचा आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील प्रवेशाचा मार्ग अधिकाधिक कठीण झाला आहे. सलग सहा पराभवांनंतर, हा संघ १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आता, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी लखनौविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Bharat Jadhav

आयपीएल २०२६ मध्ये दमदार सुरुवात करणारा पंजाब किंग्स संघ आता प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. हंगामातील पहिल्या सात सामन्यांमध्ये अपराजित राहिलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ पराभवांच्या मालिकेतून सावरू शकलेला नाही. सलग सहा सामने जिंकल्यानंतर पंजाबच्या संघाला पराभवाची साडेसाती लागली असून संघ आता 'करा किंवा मरा' अशा परिस्थितीत सापडला आहे.

पंजाब किंग्सचा सामना २३ मे रोजी लखनौ येथील श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना पीबीकेएससाठी प्लेऑफपेक्षा कमी नाही, कारण पराभव झाल्यास संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.

पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये कसे पोहोचू शकतात?

जर पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला हरवले, तर त्यांचे १५ पॉईंट्स होतील. मात्र, यामुळे प्लेऑफमधील स्थानाची हमी मिळणार नाही. जर राजस्थान रॉयल्सने आपला सामना जिंकला, तर ते १६ पॉईट्स पंजाबला मागे टाकतील. कोलकाता नाईट रायडर्स संघही १५ पॉईट्सपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत, ज्या संघाचा नेट रन रेट चांगला असेल तो प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.

जर पंजाब किंग्स आजचा सामना हरला, तर ते १३ पॉई्टससह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. मात्र जर लखनौ आणि पंजाब यांच्यातील सामना पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाला तर पंजाबचे १४ गुण होतील. तरीही, धोका कायम असणार आहे.

चौथ्या स्थानासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा

राजस्थान आणि कोलकाता हे दोन्ही संघ पंजाबला मागे टाकू शकतात. दिल्ली कॅपिटल्स संघही १४ पॉई्ट्सपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत, ज्या संघाचा नेट रन रेट चांगला असेल तो प्लेऑफसाठी पात्र ठरेल. पंजाब किंग्ससाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांचा खराब फॉर्म. सलग पराभवांनी त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E rickshaw : ई-रिक्षा मोबाइलद्वारे बंद पाडल्याचा दावा; सरकारची कठोर कारवाई; 3 अॅप तात्काळ प्ले स्टोरमधून हटवले

Maharashtra News Live Update: पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस- IMD

तब्बल १.५ कोटींची कॅश अन् सोन्याची बिस्किटं! अकोल्याच्या 'त्या' लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

पावसाळ्यात 'हे' 3 पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉइझनिंगचा होऊ शकतं

Uddhav Thackeray: राम मंदिर देणगी घोटाळ्याविरोधात ठाकरे आक्रमक, रविवारी हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन

SCROLL FOR NEXT