PSL 2026 social media
Sports

Cricket News : २ दिग्गज क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी; बंदिस्त जागेत होणाऱ्या PSL वर संकटाचे काळे ढग

Pakistan Super League 2026 faces crisis over security warning : आगामी काळात होणारी पाकिस्तान सुपर लीग अर्थात PSL स्पर्धाच संकटात सापडली आहे. पाकिस्तानच्या एका संघटनेनं डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसारख्या परदेशी खेळाडूंना धमकी दिली आहे.

Nandkumar Joshi

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत पराभवाला सामोरे गेल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि क्रिकेट बोर्ड माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर आलेलं असतानाच, आगामी काळात होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेवरही संकटांचे काळे ढग जमा झाले आहेत. पाकिस्तानमधील जमात उल अहरार संघटनेनं डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना धमकी दिली आहे. या स्पर्धेत खेळलात तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असं या संघटनेनं म्हटलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये खेळण्यासाठी तुमच्या खेळाडूंना पाठवू नका, अशी धमकी पाकिस्तानमधील एका संघटनेनं क्रिकेट बोर्डांना दिली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डानं पीएसएल स्पर्धा बंद दाराआड भरवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जाते. पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थिती आणि इंधनाच्या वाढलेल्या किंमती यामुळं हा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. आता या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विदेशी खेळाडूंना दहशतवादी संघटनेनं धमकावल्यानं स्पर्धा सुरक्षित पार पाडण्याचे आव्हान पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तानमधील जमात उल अहरार या संघटनेनं प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. विदेशी खेळाडूंनी पीएसएलमध्ये सहभाग घेऊ नये, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि डेरिल मिचेलसारखे विदेशी खेळाडू या स्पर्धेत खेळतात. या स्पर्धेतून विदेशी खेळाडूंनी तात्काळ माघार घ्यावी, असंही संघटनेनं म्हटलं आहे. सोशल मीडियावर त्याचं हे पत्रक व्हायरल होत आहे.

द संडे गार्डियन यांनी तहरीक ए तालिबान पाकिस्तान ग्रुपच्या जमात उल अहरारच्या एका वरिष्ठ कमांडरच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. तुमच्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये पाठवू नका असा सल्ला आम्ही संबंधित क्रिकेट बोर्डांना देत आहोत. त्यांना काही झालं तर आमची जबाबदारी नाही. आम्ही त्यांना आधीच इशारा दिला आहे. सामने होऊ नयेत आणि खेळाडू त्यात खेळणार नाहीत असा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

डेव्हिड वॉर्नर हा कराची किंग्ज या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर स्टीव्ह स्मिथ हा मुल्तान सुलतान्स या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत स्मिथचं पदार्पण होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि अनुभवी खेळाडू स्मिथ हा पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात महागडा क्रिकेटपटू आहे. मागील महिन्यात मुल्तान संघानं स्मिथला पाच लाख अमेरिकी डॉलरला खरेदी केलं होतं. तर या स्पर्धेतील सहभागी संघांची संख्या सहावरून आठवर गेली आहे. या स्पर्धेत मार्नस लाबुशेन, मोइन अली, डेवोन कॉनवे, एडम झम्पा यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू खेळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वसंत मोरे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला

Viral: नारंगी केसाच्या मूर्ख माणसाने...! गॅस टंचाईवर पुण्यातील हॉटेलने लावलेली नोटीस व्हायरल

Hidden Beach In konkan : कोकणात गर्दीपासून दूर लपलेले निसर्गसौंदर्य, 'हा' समुद्रकिनारा उन्हाळी सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Tuesday Horoscope: करिअरमध्ये होणार मोठा बदल, पैशाची तंगी होणार दूर; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल; नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT