pro kabaddi  twitter
क्रीडा

PKL Season 11: प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूला डच्चू; पाहा रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

Pro Kabaddi Retained Players: प्रो कबड्डी २०२५ स्पर्धेसाठी लिलाव होणार आहे. दरम्यान या लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे.

Ankush Dhavre

येत्या काही दिवसात प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. दरम्यान येत्या १५ आणि १६ ऑगस्ट रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिकावापूर्वी फ्रेंचायझींनी ८८ खेळाडूंना ३ श्रेणीत रिटेन केलं आहे. ज्यात २२ एलीट रिटेन खेळाडू, २६ रिटेन युवा खेळाडू आणि ४० नव्या युवा खेळाडूंचा समावेश असणार आहे.

पुणेरी पलटणने प्रो कबड्डीची ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार अस्लम इनामदारला आपल्या संघात कायम ठेवलं आहे. तर दिल्लीने नवीन कुमार आणि आशू मलिकला संघात कायम ठेवलं आहे. जयपूर पिंक पँथर्सने अर्जुन देशवालला आपल्या संघात कायम ठेवलं आहे.

या खेळाडूंना केलं रिलीज

फ्रेंचायजींनी युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत अनुभवी खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात पवन सेहरावत, परदीप नरवाल, फजल अत्राचली आणि मोहम्मदरेजा शादलोईसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावात दिसतील.

लिलावात बेस प्राईज किती?

अ श्रेणी - ३० लाख रुपये

ब श्रेणी - २० लाख रुपये

क श्रेणी - १३ लाख रुपये

ड श्रेणी -९ लाख रुपये

आगामी प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावात एकूण ५०० पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश असणार आहे. ज्यात खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या फायनलमध्ये असलेल्या २४ खेळाडूंचाही समावेश असणार आहे. प्रत्येक फ्रेंचायझीकडे आपला संघ निवडण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अणुशक्ती नगर मधून सना मलिक पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT