pkl 2023  saam tv news
Sports

Pro Kabaddi 2023: बेंगळुरू बुल्सचा पराभवाचा चौकार! अटीतटीच्या लढतीत हरियाणा स्टीलर्सने ६ गुणांनी मारली बाजी

Haryana Steelers vs Bengaluru Bulls, PKL 2023: प्रो कबड्डी लीग २०२३ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स आणि बेंगळुरू बुल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

Pro Kabaddi League 2023, Haryana Steelers vs Bengaluru Bulls:

प्रो कबड्डी लीग २०२३ (Pro Kabaddi 2023) स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers)आणि बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात हरियाणा स्टीलर्स ३८-३२ ने विजय मिळवला आहे. हरियाणाकडून विनयने ८ गुणांची कमाई केली. तर सिद्धार्थ देसाईने ७ गुणांची कमाई केली. हा बेंगळुरू संघाचा या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. (Latest sports updates)

या खेळाडूंनी केला दमदार खेळ..

बेंगळुरू बुल्स संघाकडून ४५ रेड करण्यात आल्या. यादरम्यान १४ रेड सक्सेसफुल ठरल्या. तर सुपर रेडचा देखील समावेश होता. हरियाणा स्टीलर्स संघाकडून ४६ रेड करण्यात आल्या. यादरम्यान १२ रेड सक्सेसफुल ठरल्या. बुल्स संघाकडून भरतने सर्वाधिक १४ गुणांची कमाई केली. तर हरियाणाकडून विनयने ८ आणि सिद्धार्थ देसाईने ७ गुणांची कमाई केली. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेर बाजी हरियाणा स्टीलर्सने मारली.

युपी योद्धाचा तेलुगू टायटन्सवर विजय...

तर दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि युपी योद्धा हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात युपीकडून ४५ रेड करण्यात आल्या. यादरम्यान १८ रेड सक्सेसफुल ठरल्या. तर तेलुगू टायटन्स संघाकडून ४५ रेड करण्यात आल्या.

यादरम्यान १६ रेड सक्सेसफुल ठरल्या. युपी संघाकडून सुरेंद्र गिलने सर्वाधिक १४ गुणांची कमाई केली. तर कर्णधार प्रदीप नरवालने ८ गुणांची कमाई केली. तेलगू टायटन्सकडून कर्णधार पवन सेहरावतने ११ गुणांची कमाई केली. दरम्यान या सामन्यात युपी योद्धाने तेलुगू टायटन्स संघावर ४८-३३ ने विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT