Indian Cricket Team saam tv
Sports

Team India Player: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं प्रायव्हेट चॅट व्हायरल; बाथरूम फोटोचीही चर्चा, नेमकं झालं काय?

Indian Cricket Team: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार कथित व्हायरल चॅटमुळे चर्चेत आला आहे. न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली असून, त्याची क्रिकेट कारकीर्द, आंतरराष्ट्रीय कामगिरी, पंजाबकडून खेळलेले सामने आणि गुजरात टायटन्समधील प्रवास जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियासाठी यंदा पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारला न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे सिरीजमध्ये संधी मिळाली आहे. सिरीजमधील शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी त्याचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलाय. मात्र या सगळ्यात गुरनूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या नावाने एक प्रायव्हेट चॅट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. हे चॅट गुरनूर ब्रारचाच असल्याचा दावा काही सोशल मीडिया युजर्स करत आहेत. मात्र या व्हायरल चॅटची आम्ही पुष्टी करत नाही.

स्नॅपचॅटवरील चॅट्स व्हायरल झाल्याचा दावा

व्हायरल होत असलेला हा चॅट स्नॅपचॅट अॅपवरील आहे. या चॅटमध्ये गुरनूरचा एक शर्टलेस फोटोही दिसतोय. या फोटोमध्ये त्याने शरीराचा काही भाग टॉवेलने झाकलेला आहे. हा फोटो गुरनूरचाच असल्याचा दावा करणारे युजर्स त्याच्या गळ्यातील चेनचा आधार घेत आहेत.

कारण गुरनूरने याआधी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्येही अशीच चेन घातलेली दिसतेय. व्हायरल फोटोतील चेन आणि इन्स्टाग्रामवरील फोटोतील चेन सारखीच असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.

गुरनूरचं क्रिकेट करियर

दरम्यान गुरनूर ब्रार हा पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याची उंची 6 फूट 5 इंच आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी एकूण 9 वनडे सामने खेळलेत. याच वर्षी जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या 9 सामन्यांमध्ये त्याने एकूण 14 विकेट्स घेतल्या आहेत. 27 रन्स देऊन 3 विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही गुरनूरने पंजाबकडून चांगली कामगिरी केलीये. पंजाबसाठी त्याने आतापर्यंत 22 फर्स्ट क्लास, 28 लिस्ट ए आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 71 विकेट्स आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 26 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय गुरनूर आयपीएलमध्येही खेळतो. तो शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स टीमचा भाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Cycling vs Walking: वजन कमी करण्यासाठी सायकलिंग की वॉकिंग? जाणून घ्या कोणता व्यायाम अधिक फायदेशीर!

Housing Society : मराठी सभासदाचे नाव मतदार यादीतून वगळण्याचे प्रकरण; सोसायटीच्या चार सदस्यांना पाच वर्षांची बंदी

Gold Rate Today: सोनं महागलं की स्वस्त झालं? एका क्लिकवर पाहा २४K, २२K आणि १८K चे ताजे भाव

Accident News : भीषण अपघात! एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT