manu bhaker twitter
Sports

Manu Bhaker: मनूने ज्या पिस्तूलने कांस्यपदकावर निशाणा साधला, त्या पिस्तुलाची किंमत माहितेय का?

Manu Bhaker Pistol Price: काही खेळ असे आहेत ज्यात उपकरणे खेळाडूच्या यशात महत्त्वाचे योगदान देतात. मनू वापरत असलेले उपकरण कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Sejal Purwar

सध्या संपूर्ण जगात एकच नाव गाजतंय ते म्हणजे मनू भाकर, मनू भाकर ही पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये दुहेरी पदक विजेती बनली आहे. परंतू ही अशी बाब आहे जी स्वतंत्र भारतात यापूर्वी कधीही घडली नाही. कारण पिस्तूल नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा विक्रम करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये पहिले पदक (कांस्य) जिंकले. त्यानंतर मनू आणि सरबज्योत सिंग या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.

काही खेळ असे आहेत ज्यात उपकरणे खेळाडूच्या यशात महत्त्वाचे योगदान देतात. मनू वापरत असलेले उपकरण कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मनूच्या पिस्तूलबद्दल जाणून घेण्यास अनेक नेमबाज आणि चाहते उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊया.

मनू भाकरचे आवडते पिस्तूल हे वॉल्टर जीपी एअर पिस्तूल आहे, हे उच्च दर्जाचे स्पर्धात्मक शस्त्र आहे जे अचूकता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. वॉल्टर जीपी एअर पिस्तूलची उच्च गुणवत्ता आणि कामगिरी यामुळे हे पिस्तुल स्पर्धा किंवा नेमबाजीसाठी लोकप्रिय बनले आहे.

चला तर जाणून घेऊया मनू भाकरने कोणत्या कंपनीच्या पिस्तुलाने हा इतिहास रचला. मनू भाकर जेव्हा शूटिंग स्पर्धांमध्ये भाग घेते तेव्हा ती प्रसिद्ध जर्मन बंदुक कंपनी वाल्थरने बनवलेले पिस्तूल वापरते. या वॉल्टर जीपी एअर पिस्तूलची किंमत अंदाजे 3,500 युरो ते 4,000 युरो म्हणजेच 3,15,000 ते 3,55,000 रुपयांपर्यंत आहे. ही एक प्रीमीयम बंदुक आहे. मात्र हे देखिल लक्षात घेणे गरजेचे आहे की स्थान, विक्रेता आणि मॉडेल यांसारख्या बदलांनूसार पिस्तूलच्या किंमती बदलू शकतात.

टोकियोमध्ये पिस्तुलने केला होता विश्वासघात

पॅरिसमध्ये इतिहास रचण्यात यशस्वी ठरलेल्या मनूने 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकनंतर नेमबाजीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कारण देखिल मोठे होते म्हणजे टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत मनूचे पिस्तूल तुटले होते. तिला 44 शॉट्स घ्यायचे होते, पण तिला 20 मिनिटे लक्ष्य करता आले नाही. तिची पिस्तूल दुरुस्त करूनही मनूला केवळ 14 शॉट मारता आले आणि ती अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. यानंतर ती शूटिंग रेंजमधून रडत बाहेर आली होती. त्यानंतर मनूला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर ती इतकी निराश झाली की तिने शूटिंग सोडण्याचा विचार सुरू केला होता. पण मनू भाकरने या सगळ्यावर मात करत आपला खेळ सुधारला आणि पॅरिसमध्ये इतिहास रचण्यात यश मिळवले. साहजिकच यात मनूच्या वॉल्थर पिस्तूलचाही यशात महत्त्वाचा वाटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT