posco, nanded, Marathi news, Nanded Crime News Updates , SaamTV
Sports

Sports : तिच्याशी झटायचा, अश्लील व्हिडीओ पाठवायचा; क्रीडा प्रशिक्षकास अटक

चंदिगढ मधील एमएमएस प्रकरण आणि मुंबईच्या पवईतील प्रकरण ताजे असतानाच नांदेडात घडलेल्या प्रकारांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संतोष जोशी

Nanded Crime News : जिम्नॅस्टिक प्रशिक्षकाने विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशिक्षका विरोधात शिवाजीनगर पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळं नांदेडच्या क्रीडा (sports) क्षेत्रास धक्का बसला आहे. (Nanded Latest Marathi News)

नांदेड शहरातील पंधरा वर्षाची मुलगी जिम्नॅस्टिक हाॅल येथे सराव करत असताना तिच्याशी प्रशिक्षक लगट करण्याचा प्रयत्न करीत असे. चेंजीग रुममध्ये कपडे बदलताना ताे तिला चोरून पाहत असे. तसेच मोबाईलवर अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याचे घाणेरडे प्रकार देखील ताे करत असे.

वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने तिच्या कुटूंबियांना याबाबतची माहिती दिली. यावेळी कुटुंबाला देखील धक्का बसला. पिडीत मुलीच्या आईने तातडीने पाेलिस ठाण्यात धाव घेतली. तिने प्रशिक्षक मुलीला त्रास देत असल्याची तक्रार दिली.

या तक्रारीवरून पाेलिसांनी प्रशिक्षक जयपाल रेड्डी याच्या विरोधात विनयभंग आणि पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रेड्डीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान या घटनेने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT