Urvashi Rautela React on Rishabh Pant Question Saam Tv
Sports

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाला एका पॉडकास्ट दरम्यान ऋषभ पंतसोबत लग्न करण्याबद्दल विचारण्यात आला होता. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे तिला कळत नव्हतं. पण तिने चाहत्याच्या प्रश्नाला फक्त दोन शब्दात उत्तर चर्चांवर पडदा टाकला.

Bharat Jadhav

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्यातील वाद सर्वांच माहितीये. काही वर्षांपूर्वी पंत आणि उर्वशी डेट करत असल्याच्या बातम्या माध्यमात आल्या होत्या. मात्र काही दिवसांनंतर ऋषभ पंत आणि रौतेलामध्ये बिनसल्याने त्याने तिचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचा वाद समोर आला होता. दरम्यान उर्वशीने पंतबाबत अनेकदा भाष्य केली आहेत, पण पंतने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये. आता पुन्हा एकदा उर्वशी एका कार्यक्रमात पंतबद्दल बोललीय.

सोशल मीडियावर एका पॉडकास्टचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलेला भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतविषयी विचारणा करण्यात आली. यात अर्थात उर्वशीला पंतसोबत लग्न करणार का हाही प्रश्न करण्यात आला होता. पॉडकास्टमधील निवेदकाने उर्वशीला चाहत्यांनी केलेल कमेंट वाचल्या. यात एका चाहत्याने उर्वशी आणि पंतच्या लग्नाविषयी विचारणा केली होती.

सोशल मीडियावरील कमेंट्स वाचत असताना होस्टने विचारले ऋषभ तुमचा आदर करतो. ते तुम्हाला आनंदीदेखील ठेवतील. तू त्याच्याशी लग्न करशील याचा मला आनंद होईल, असं चाहत्याने आपल्या कमेंटमध्ये म्हटलं होतं. यावर काय उत्तर द्यावे हे उर्वशीला समजत नव्हतं. काही क्षण शांत राहिल्यानंतर तिने नो कमेंट, म्हणत हा पंत आणि तिच्या लग्नाचा विषय टाळला.

पंतचे टीम इंडियात पुनरागमन

ऋषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये अपघात झाला होता. त्यादरम्यान उर्वशी रौतेलाने तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. आता भारतीय संघासाठी ऋषभ पंत मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय. जवळपास १५ महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर पंतने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. या आयपीएलमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT