PM Modi News Saamtv
Sports

PM Modi News: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी; खेळाडूंना धीर दिला अन्... शमीची भावूक पोस्ट

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली.

Gangappa Pujari

PM Modi Meet Indian Cricket Team:

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सात गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात झालेल्या या पराभवाने करोडो भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले. या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू खूपच भावूक झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली.

टीम इंडियाच्या (Team India) विश्वचषकातील पराभवाने देशभरातील क्रिकेट प्रेमी निराश झाले आहेत.स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहाव लागल्याने 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. या पराभवामुळे भारतीय खेळाडू खूपच निराश झालेत.

त्यांना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमला भेट दिली. टीम इंडियाच्या पराभवानंतर पंतप्रधानांनी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. मोहम्मद शमीने एक फोटो ट्विट केला आहे. या पोस्टमध्ये भावूक झालेल्या शमीला पंतप्रधान मोदी धीर देत असल्याचे दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाला शमी?

"मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो. जे स्पेशली ड्रेसिंग रुममध्ये आले आणि त्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही नक्कीच पुन्हा दमदार पुनरागमन करु" असा विश्वास मोहम्मद शमीने व्यक्त केला आहे. तसेच रविंद्र जडेजानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने या पराभवाने निराशा झाली असली तरी पुन्हा पुनरागमन करु.. असे त्याने म्हणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

Marathi Bhasha Vijay Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT