टोकियो ऑलिम्पिक खेळासाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे पंतप्रधानांकडून कौतुक  Twitter/@PMO India
Sports

टोकियो ऑलिम्पिक खेळासाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे पंतप्रधानांकडून कौतुक

टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्वतःची धडपड असते, बरीच वर्षांची मेहनत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : मन की बात' (Man ki Baat) या कार्यक्रमातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशभरातील खेळाडूंच्या योगदानाचे कौतुक केले. टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) पार्श्वभूमीवर यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी दिवंगत धावपटू मिल्खा सिंग (Runner Milkha Singh) यांच्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय त्यांनी टोकियो ऑलंपिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळांडूचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचे कौतुकही केले.

Milkha Singh

यावेळी मोदी म्हणाले, "जर आपण ऑलिम्पिकविषयी बोलत आहोत तर मिल्खासिंग यांना विसरून कसे चालेल. काही दिवसांपूर्वी, कोरोनामुळे मिल्खासिंग आपल्यातून निघून गेले. ते रुग्णालयात असताना मला त्याच्यांशी बोलण्याची संधी मिळाली. 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता आमचे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टोकियोला जात आहेत, तर आताही तुम्हाला आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवावे लागेल, तुमचे मोलाचे मार्गदर्शन आपल्या खेळाडूंना दिले पाहिजे, अशी विनंती मी त्यांना केली होती. ते खेळाबद्दल इतके समर्पित आणि भावनिक होते की आजारी असताना देखील त्यांनी त्वरित यासाठी सहमती दर्शविली, परंतु दुर्दैवाने नियतीच्या मनात काही वेगळेच होते,"

यावेळी बोलताना त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, "टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्वतःची धडपड असते, बरीच वर्षांची मेहनत असते. ते केवळ स्वत: साठीच नव्हे तर देशासाठी जात आहेत. आता या खेळाडूंनी भारताची शान वाढवायची आहे. आपल्या खेळातून देशातील लोकांची मने जिंकायची आहेत, म्हणूनच मी माझ्या देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो की, आपण आपल्या खेळाडूंवर जाणीवपूर्वक किंवा नकळत दबाव आणू नका. याउलट आपण त्यांचे मनोधैर्य वाढवा आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या,''

''ऑलिम्पिकमधील भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2012 च्या लंडन गेम्समध्ये होती. या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य पदकांसह सहा पदके जिंकली. यानंतर भारतीय खेळाडुंनी रिओ ऑलिम्पिकमध्ये केवळ दोन पदके मिळवली,'' असेही त्यांनी नमूद केले.

manish kaushik

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलताना पंतप्रधानांनी धनुर्धारी दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव, हॉकीपटू नेहा गोयल, बॉक्सर मनीष कौशिक, चालण्याच्या स्पर्धेत भाग घेणारी प्रियंका गोस्वामी, भाला फेकणारा शिवपाल सिंग, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि त्याचा साथीदार सातविक साईराज यांचा उल्लेख केला. तलवारबाज सीए भवानी देवीचे आयुष्यातील संघर्षाचेही कौतुक केले.

खेळाडूंच्या संघर्षाबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, ''आपल्या देशातील बहुतेक खेळाडू लहान शहरे आणि ग्रामीण भागातील आहेत. टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा इथपर्यंतचा संघर्षही आपल्याला प्रेरणा देणारा आहे.

praveen jadhav

" ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पहिल्यांदाच पात्र ठरलेल्या जाधव आणि गोयल यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. जाधवचे आई-वडील मजूर म्हणून काम करत होते, तर गोयलची आई सायकल कारखान्यात काम करत होती. जाधवचे पालक मजुरांची नोकरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा पहिल्यांदाच टोकियोला ऑलिम्पिक खेळण्यासाठी जात आहे. केवळ त्यांच्या पालकांनाच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे,''

''तर नेहादेखील टोकियोला जाणाऱ्या महिला हॉकी संघाची सदस्य आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिची आई आणि बहिण सायकल कारखान्यात काम करतात.

Neha Goyal

उत्तर प्रदेशची प्रियंका गोस्वामी 20 किमी चालण्याच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रियंकाचे वडील बस कंडक्टर आहेत. लहान असताना प्रियंकाला पदकविजेत्यांचे बॅग आवडत असे. या आकर्षणाने तिने प्रथमच चालण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. आता, आज ती यात मोठी चॅम्पियन आहे. त्याचबरोबर, ऑलिम्पिक गेम्ससाठी पात्र ठरलेली देशातील पहिली तलवारबाज भवानी देवीच्या आईने तिचे प्रशिक्षण सुरू ठेवण्यासाठी स्वतःचे दागिनेदेखील गहाण ठेवल्याचे मी एके ठिकाणी वाचले होते,'' आशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT