r ashwin twitter
Sports

R Ashwin News: 'माझ्या वडिलांना माफ करा, त्यांना एकटं सोडा..', वडिलांच्या वक्तव्यावर अश्विनचं स्पष्टीकरण

R Ashwin Reaction On His Father Statement: भारताचा स्टार खेळाडू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली.

Ankush Dhavre

भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अश्विनने पत्रकार परिषदेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

अश्विनच्या निवृत्तीनंतर, त्याच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलं होतं. अश्विनने अपमानामुळे निवृ्त्ती जाहीर केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. दरम्यान आता अश्विनने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

अश्विनच्या निवृ्त्तीनंतर त्याच्या वडिलांनी केलेलं हे वक्तव्य तुफान चर्चेत आहे. टीव्ही अँकर आणि सुमंत रमनने अश्विनच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आता यावर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देत त्याने स्पष्टीकरणही दिलं आहे.

काय म्हणाला अश्विन?

'माझे वडील हे मीडिया प्रशिक्षिात नाहीत. मी कधीच असा विचार केला नव्हता की, तुम्ही 'वडिलांच्या विधानांच्या परंपरेचे पालन कराल. तुम्ही त्यांना माफ करा आणि त्यांना एकटं सोडा.' अश्विनने ही पोस्ट शेअर करत हसायचे इमोजी देखील शेअर केले आहेत. यावरुन अश्विनचा कुठलाही अपमान न झाल्याचं स्पष्ट होत आहे.

काय म्हणाले होते अश्विनचे वडील?

'अश्विन निवृत्त होतोय, ही बातमी मला शेवटच्या क्षणी मिळाली. त्याच्या मनात नेमकं काय सुरु आहे, हे मला कळालं नव्हतं. त्याने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. मी त्याच्या निर्णयाचा स्विकार केला. त्याने जो निर्णय घेतलाय, त्यामुळे मी आनंदी आहे आणि नाराजही आहे. कारण त्याने खेळणं सुरु ठेवायचं होतं. निवृत्ती घ्यायची हा अश्विनचा निर्णय होता. आणि मी त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र त्याने ज्या पद्धतीने निवृत्ती घेतली आहे, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं. अपमान हे यामागचं प्रमुख कारण असू शकतं.' असं अश्विनचे वडील म्हणाले.

आर अश्विनच्या हा कसोटी क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाज आहे. त्याच्या नाव कसोटी क्रिकेटमध्ये ५३७ गडी बाद करण्याची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT