R Ashwin Retirment: रोहित- गंभीरमुळे अश्विनने निवृत्ती घेतली? पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा आरोप

Basit Ali On R Ashwin Retirement: भारताचा स्टार खेळाडू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने मोठे आरोप केले आहेत.
R Ashwin Retirment: रोहित- गंभीरमुळे अश्विनने निवृत्ती घेतली? पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा आरोप
r ashwintwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना ड्रॉ राहिला. हा सामना झाल्यानंतर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

आर अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर, सर्वांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींच्या मते अश्विनने निवृत्ती जाहीर करण्याचं कारण वेगळंच आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने मोठे आरोप केले आहे.

R Ashwin Retirment: रोहित- गंभीरमुळे अश्विनने निवृत्ती घेतली? पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा आरोप
IND vs AUS: सिराजची ती चूक टीम इंडियाला महागात पडली असती! ड्रॉ सोडा, सामनाच हातून गेला असता

बासित अलीच्या मते, जर विराट कोहली कर्णधार असता, तर अश्विनने आता निवृत्ती जाहीर केली नसती. त्याने थेट रोहित शर्मा आणि गौतम गंभीरवर निशाणा तर नाही साधला, मात्र नकळतपणे रोहित आणि गौतम गंभीर त्याच्या निवृत्तीमागचं कारण असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्याच्या मते, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू असताना असं मध्येच निवृत्ती घेणं हा चुकीचा निर्णय आहे.

R Ashwin Retirment: रोहित- गंभीरमुळे अश्विनने निवृत्ती घेतली? पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा आरोप
IND vs AUS: विराटची बॅट घेऊन आला अन् खणखणीत षटकार खेचला! Akash Deep च्या शॉटवर कोहलीची कडक Reaction- VIDEO

काय म्हणाला बासित अली?

बासित अली म्हणाला, निवृत्ती जाहीर केल्यानंतर आर अश्विन सरळ घरी निघून गेला. जर रोहित आणि गंभीरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर तो नक्कीच थांबला असता. मात्र त्यांनी असं केलं नाही. यावरून असं दिसतंय की, भारतीय संघात नक्कीच काहीतरी सुरू आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला, ' जर विराट कोहली भारताचा कर्णधार असता, नक्कीच त्याने आर अश्विनला निवूर्ती घेण्यापासून थांबवलं असतं. त्याने निवृत्ती घेण्यापासून थांबवलं असतं. अश्विन पुढील दोन्ही सामने खेळू शकला असता. कारण सिडनी कसोटीत भारताला अश्विनची गरज पडेल. विराटच नाहीतर रवी शास्त्रींनी देखील त्याला थांबवलं असतं.

R Ashwin Retirment: रोहित- गंभीरमुळे अश्विनने निवृत्ती घेतली? पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा आरोप
IND vs AUS: गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण

'काही गोष्टी बोलल्या जात नाहीत, तर त्या दिसून येतात. तुमचे शारीरिक हावभाव सर्व काही सांगून जातात. ज्याप्रकारे अश्विनने विराटला मिठी मारली ते सर्व काही सांगून जातं. मला माहितेय आर अश्विन आधीसारखी गोलंदाजी करत नव्हता. मात्र तो इतकाही वाईट गोलंदाज नाही. कसोटीत ५३७ गडी बाद करणं मोठी गोष्ट आहे.' असं बासित अली म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com