Dabang Delhi vs Patna Pirates saam tv news
Sports

PKL Season 10: पटनाचा डिफेन्स गडबडला,दिल्लीचे रेडर्स चमकले! अटीतटीच्या लढतीत दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय

Dabang Delhi vs Patna Pirates: प्रो कबड्डी स्पर्धेच्या १० व्या हंगामात एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. ५ जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात पटना पाटरेट्स आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

Pro Kabaddi Season 10, Dabang Delhi vs Patna Pirates Match Report:

प्रो कबड्डी स्पर्धेच्या १० व्या हंगामात एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. ५ जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात पटना पाटरेट्स आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दबंग दिल्लीने दमदार खेळ करत पटनाला १ गुणाने धूळ चारली आहे.

एनएससीआय स्टेडियमध्ये झालेल्या या लढतीत दबंग दिल्लीकडून आशू मलिक(10गुण), पटना पायरेटस कडून सचिन (10गुण) आणि सुधाकर (9गुण) यांनी चमकदार कामगिरी केली.

त्याआधी पूर्वार्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दबंग दिल्ली संघाने पटना पायरेटस वर 10व्या मिनिटाला पहिला आणि सहाव्या मिनिटांनी दुसरा असे सलग दोन लोन चढविले.

दबंग दिल्लीच्या मलिक, नीतू शर्मा आणि मनजीत यांनी पूर्वार्धात 20चढायात 13गुण मिळवले. मलिकने मध्यातरांपूर्वी एक सुपर रेड करताना आपली एकदाही पकड होऊ दिली नाही. सचिनने अनेकदा पायरेटसना पुनरागमनाची संधी मिळवून दिली होती. परंतु दिल्लीने आपले वर्चस्व कायम राखताना मध्यंतराला 13गुणांची आघाडी मिळवली. (Latest kabaddi news)

उत्तरार्धात पटना पायरेटसच्या बचाव पटूना सुर गवसला आणि दबंग दिल्ली वर लोन चढवाताना पटना संघाने आपली पिछाडी सहा गुनांपर्यंत कमी केली. सचिनने सुपर रेड करताना पटना संघाला बरोबरीची संधी मिळवून दिली.

सचिन आणि सुधाकर यांच्या चढाया मुळे पटना संघाची पिछाडी केवळ तीन गुणांचीच राहिली होती. एका क्षणी पटना संघ बाजी मारण्याची चिन्हे होती. परंतु दिल्ली च्या खेळाडूंनी सायम राखताना केवळ एक गुणाने विजयाची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

SCROLL FOR NEXT