प्रो कबड्डी २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबईमध्ये खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक स्टार खेळाडू कोट्यवधी झाले आहेत. लिलावाच्या पहिल्या दिवशी २० खेळाडू सोल्ड झाले तर ४ खेळाडू अन्सोल्ड झाले आहेत. दरम्यान हरियाणाचा सचिन तन्वर या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
हरियाणाचा सचिन तन्वर या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर तमिळ थलाईवाजने २.१५ कोटींची बोली लावली आणि आपल्या संघात स्थान दिलं. गेल्या हंगामात त्याने पटना पायरेट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सचिनची बेस प्रॉईज ३० लाख रुपये होती.
सचिनला आपल्या संघात घेण्यासाठी तेलुगू टायटन्स संघाने पहिलीच बोली ७० लाखांची लावली. त्यानंतर युपी आणि गुजरात यांच्यात सचिनला आपल्या संघात घेण्यासाठी स्पर्धा रंगली शेवटी बाजी मारली ती तमिळ थलाईवाजने. या संघाने २.१५ कोटी रक्कम मोजत सचिनला आपल्या ताफ्यात घेतलं.
प्रो कबड्डी २०२४ स्पर्धेच्या लिलावाची सुरुवात शादलोईच्या बोलीने झाली. ए कॅटेगरीत आलेल्या मोहम्मदरेजा शादलोईची बेस प्राईज ३० लाख रुपये होती. या अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात स्थान देण्यासाठी जवळपास सर्वच संघांनी जोर लावला. शेवटी हरियाणा स्टिलर्सने २.०७ कोटी मोजत त्याला आपल्या संघात स्थान दिले.
या लिलावात पहिलाच दिवस रेकॉर्ड ब्रेकिंग ठरला आहे. पहिल्याच दिवशी ८ खेळाडूंनी १ कोटींचा आकडा पार केला. सचिन तन्वर - २.१५ कोटी, मोहम्मदरेजा शादलोई- २.०७ कोटी, गुमान सिंग - १.९७ कोटी, पवन सेहरावत - १.७२५ कोटी, भरत -१.३० कोटी, मनिंदर सिंग -१.१५ कोटी, अजिंक्य पवार - १.१०७ कोटी, सुनील कुमार - १.०१५ कोटी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.