PBKS vs GT playing XI prediction Punjab kings vs Gujarat Titans playing 11 prediction news in marathi amd2000 twitter
Sports

PBKS vs GT,IPL 2024: पंजाबच्या संघात होणार मोठा बदल! PBKS vs GT सामन्यात अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

PBKS vs GT, Playing XI Prediction: पंजाबच्या होम ग्राऊंडवर आज पंजाब किंग्जचा संघ गुजरात टायटन्स संघासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?जाणून घ्या.

Ankush Dhavre

पंजाबच्या होम ग्राऊंडवर आज पंजाब किंग्जचा संघ गुजरात टायटन्स संघासोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. गेल्या वेळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गुजरातचा संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरेल. तर दुसरीकडे पंजाबचा कर्णधार शिखर धवन अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे सॅम करन संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.

पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार शिखर धवन अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी प्रभसिमरन सिंग डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. यासह रायली रुसोला देखील संघात स्थान दिले जाऊ शकते. गेल्या काही सामन्यांमध्ये शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी शानदार खेळ करून दाखवला आहे. त्यामुळे या दोघांनाही संधी मिळणं निश्चित आहे.

तर गुजरात टायटन्स संघाविरुद्ध बोलायचं झालं तर, गेल्या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा याच उद्देशाने गुजरातचा संघ मैदानात उतरेल. गेल्या सामन्यात गुजरातची फालंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली होती. त्यामुळे हा सामना जिंकायचा असेल तर गुजरातच्या फलंदाजांना मैदानावर टीचून फलंदाजी करावी लागेल.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग/अथर्व तायडे, राइली रूसो, सॅम करन (कर्णधार), लियाम लिविंगस्टन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगीसो रबाडा, अर्शदीप सिंग

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद/अज़मतुल्लाह उमरजई, स्पेंसर जॉनसन, संदीप वारियर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लवकरच घरी आलो जेवायला'; आईला शेवटचा फोन, J.J हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन समुद्रात उडी

Wainganga Flood : वैनगंगेला मोठा पुर; ब्रह्मपुरी तालुक्यातील ८ गावांना पाण्याचा वेढा, अनेक कुटुंबाना हलविले सुरक्षितस्थळी

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह अनेक भागात पाऊस, नागरिकांचे हाल

Bigg Boss 19 : टीम इंडियाच्या या खेळाडूची Ex पत्नीची बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री?

Pune News: पुण्यात चाललंय काय? स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, पोलिसांकडून १८ मुलींची सुटका|VIDEO

SCROLL FOR NEXT