PBKS VS DC Saam tv
Sports

PBKS VS DC Playing 11: मुंबईला मागे सोडत पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! फक्त दिल्लीविरुद्ध करावं लागेल 'हे' काम

IPL 2023 Playoffs: पंजाब किंग्ज संघ आज होणाऱ्या सामन्यात आपल्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Ankush Dhavre

PBKS VS DC IPL 2023: पंजाब किंग्ज संघ आज होणाऱ्या सामन्यात आपल्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झालेला दिल्लीचा संघ जोरदार विजय मिळवून पॉईंट्स टेबलचं समीकरण बिघडवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

पंजाब संघाने आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यांमध्ये ६ सामने जिंकले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. १२ गुणांसह अजूनही पंजाब किंग्ज संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सला करावं लागेल हे काम..

गेल्या आठ्वड्यात दिल्ली विरुद्ध ३१ धावांचा विजय मिळवल्यानंतर नक्कीच पंजाब संघाचा आत्मविश्वास वाढला असणार आहे. या सामन्यात देखील शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाब किंग्ज संघ जोरदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

मात्र पंजाबला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना आपल्या फलंदाजीत काही बदल करावे लागतील. दिल्ली विरुद्व झालेल्या सामन्यात प्रभसिमरन सिंगला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

धवनने मोलाचं योगदान दिलं होतं. मात्र इतर फलंदाजांकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नव्हती.

पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी...

पंजाब किंग्ज संघाला अनेकदा वर जाण्याची संधी मिळाली आहे. या संघाच्या आयपीएल २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यापैकी ६ सामने जिंकले आहेत.

तर ६ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. १२ गुणांसह हा संघ पंजाबचा संघ आठव्या स्थानी आहे. या संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आपल्या नेट रन रेटमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. पंजाबचा नेट रन रेट ०.२६८ इतका आहे. (Latest sports updates)

अशी असु शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पंजाब किंग्ज :

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, शाहरुख खान, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, नॅथन एलिस आणि अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्स :

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, अक्षर पटेल, ललित यादव, अमन खान, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: भाजप वॉर्ड अध्यक्षाचेच नाव तीन वेगवेगळ्या एपिक नंबरवर, मनसेचा गंभीर आरोप

धक्कादायक! महिला काँग्रेस नेत्याचा अश्लील फोटो व्हायरल, AIनं तयार केला अन्.. नेमकं घडलं काय?

Labh Drishti Yog 2025: 18 नोव्हेंबरपासून 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; बँक बॅलन्स डबल होऊन सर्व स्वप्नही होणार पूर्ण

Shocking: धक्कादायक! मित्रच बनला वैरी; २५ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT