Manasvi Choudhary
काळ्या रंगाची पैठणी साडी म्हणजे सौंदर्य आणि परंपरेचा साज. मकरसंक्रात निमित्त तुम्ही खास काळ्या रंगाची पैठणी साडी परिधान करू शकता.
काळ्या रंगाच्या पैठणी साडीच्या अनेक डिझाईन्स आहेत तुम्ही खास सणासुदीला असा लूक करू शकता.
पारंपारिक सोन्याच्या जरीऐवजी आता 'चांदीच्या जरीचं' काम असलेली काळी पैठणी लोकप्रिय आहे. मोर किंवा अस्सावली डिझाईनमध्ये या पैठणी साडी असतात.
काळ्या पैठणी साडीवर 'गुलबक्षी किंवा नारंगी रंगाचे काठ असलेल्या साड्या सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. खास मकरसंक्रात निमित्त असा लूक करा.
साडीच्या संपूर्ण पदरावर सोन्याच्या धाग्यांनी नाजूक नक्षीकाम केलेले असते, अशी पैठणी शाही लूक देते ही पैठणी नेसल्यास लूक खूप मनमोहक दिसतो
साडीवर लहान लहान सोन्याच्या जरीच्या बुट्या आणि काठावर मोठा मोर असलेले डिझाईन 'क्लासी' आणि सोबर लूकसाठी बेस्ट आहे.
वजनाला हलकी साडी हवी आहे, त्यांच्यासाठी काळी सेमी-पैठणी ज्यावर मोठ्या काठांचे डिझाईन आहे, सध्या खूप चालत आहे.