PAT CUMMINS HAT TRICK AFP
क्रीडा

Pat Cummins Hat trick: पॅट कमिन्सची टी-20 WC मध्ये हॅट्ट्रिक! असा रेकॉर्ड करणारा ठरला 7 वा गोलंदाज; पाहा VIDEO

Pat Cummins Hat Trick Video: पॅट कमिन्सने टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली आहे. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात इतिहास रचला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत तो हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तर या स्पर्धेच्या इतिहासातील सातवा गोलंदाज ठरला आहे. यासह ऑस्ट्रेलियासाठी टी -२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ४४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार, २८ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पॅट कमिन्सने ३ मोठे झटके दिले. ऑस्ट्रेलियाकडून १८ वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स गोलंदाजीला आला होता. त्याने महमदुल्लाहला २ धावांवर क्लीन बोल्ड केलं.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने मेहदी हसनला झेलबाद करत माघारी धाडलं. मेहदी हसन षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर २० वे षटक टाकण्यासाठी कमिन्स पुन्हा एकदा गोलंदाजीला आला. यादरम्यान त्याने पहिल्याच चेंडूवर तौहिद हृदोयला बाद करत माघारी धाडलं. या हॅट्रिकसह तो ऑस्ट्रेलियासाठी हॅट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी हॅट्रिक घेणारे गोलंदाज

ब्रेट ली, विरुद्ध बांगलादेश , २००७

एश्टन एगर, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२०

नॅथन एलिस, विरुद्ध बांगलादेश, २०२१

पॅट कमिन्स, बांगलादेश, २०२४

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाला २० षटकअखेर १४० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आणि ११.२ षटकात संघाची धावसंख्या १०० धावांवर पोहोचवली. मात्र त्यानंतर पाऊस आला आणि हा सामना थांबवावा लागला. त्यानंतर सामना होऊच शकला नाही. ऑस्ट्रेलियासाठी पार स्कोअर ७८ होता. यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना २८ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT