Eng vs Aus 1st Test Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पाचव्या(२० जून) दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे.
बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २८१ धावांची गरज होती. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ९२.३ षटकात पूर्ण केले. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून आलेल्या इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३९३ धावा करत डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात आघडी घेऊन उतरलेल्या इंग्लंडला २७३ धावा करता आल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला २८१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला. (Latest sports updates)
कर्णधाराची झुंजार खेळी..
ऑस्ट्रेलियाला या सामन्यात २८१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना २२७ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज माघारी परतले होते. त्यामुळे असे वाटत होते की, इंग्लंड या सामन्यात एकतर्फी विजय मिळवणार.
मात्र पॅट कमिन्स आणि नॅथन लायनची जोडी मैदानावर टिचून उभी राहिली. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरले. या डावात कमिन्सने नाबाद ४४ तर लायनने नाबाद १६ धावांची खेळी केली. दोघांनी ९ व्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली आणि हातातून निसटलेला सामना खेचून आणला.
उस्मान ख्वाजा ठरला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी..
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने दोन्ही डावात अप्रतिम फलंदाजी केली. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने १४१ तर दुसऱ्या डावात ६५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.