Paris Olympics Opening Ceremony Live Saam Digital
क्रीडा

Paris Olympics Opening Ceremony Live : सीन नदीच्या तिरावर लेडी गागाचा परफॉर्मन्स, हजारो चाहत्यांची उपस्थिती; जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याची खास वैशिष्ट्ये

Sandeep Gawade

बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याला आज दिमाखात सुरुवात होत आहे. जगभरातील विविध देशांचे खेळाडू आणि हजारो जाहत्याच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिकचा सोहळा नदीतीरावर होत आहे. ऑलिम्पिक परेटमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर असणार आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू भारतीय संघाची महिला ध्वजवाहक असणार आहे, तर टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल हे पुरुष ध्वजवाहक असणार आहेत.

प्रमुख पाहुणे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या उपस्थितीत सीन नदीच्या पुलावर फ्रेंच ध्वज फडकवण्यात आला. यासह भव्य उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. सीन नदीवर 100 बोटींवर 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी 6 किलोमीटरचा प्रवास केला आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयाततून अंतिम मशालवाहक जात आहे. लूवर संग्रहालयात जगातील सर्व संस्कृतीचा खजिना आहे आणि त्यामुळेच फ्रान्स जगाशी जोडलं गेलं आहे.

ऑलिम्पिक परेडमध्ये काही देशांचे संचलन झाल्यानंतर प्रसिद्ध लेडी गागाचा परफॉर्मन्स झाला. यानंतर पुन्हा खेळाडूंचे संचलन सुरू झालं.

फ्रान्सच्या प्रसिद्ध पॉप स्टार्सपैकी एक आका नाकामुराने रिपब्लिकन गार्डचा ऑर्केस्ट्रा पोंट डेस आर्ट्सवर सादरीकरण केलं. हा क्षण फ्रेंच भाषेच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा असतो.

खेळाडूंचे संचलन सुरू झाले असून पहिल्यांदा ग्रीसच्या खेळाडूंचं बोटीतून संचलन झालं. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका, जर्मनीच्या संघांनी संचलन केलं. सीन नदीपात्रात हे संचलन सुरू आहे.

फ्रेंच इतिहासातील 10 सुवर्ण नायिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ऑलिम्पे डी गॉजेस, ॲलिस मिलियट, गिसेल हॅलिमी, सिमोन डी ब्यूवॉयर, पॉलेट नार्डल, जीन बॅरेट, लुईस मिशेल, क्रिस्टीन डी पिझान, ॲलिस गाय आणि सिमोन व्हील या फ्रान्सच्या १० सुवर्ण विजेत्या महिला आहेत.

ऑलिम्पिक मेडल पॅरिसमध्ये कसं तयार करण्यात आलं. याची नृत्यातून एक झलक दाखवण्यात आली. ब्रेक डान्स ब्रेकिंग या नावाने ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Viral Video : क्लास रूमध्ये पोरींचा जोरजोरात वाद, पोराला राग अनावर, डेस्कवरुन उठला अन्...

Ajinkya Rahane: योगायोग की आणखी काही...; टीम इंडिया फ्लॉप ठरताच अजिंक्य रहाणेने केली सूचक पोस्ट, म्हणाला...!

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

SCROLL FOR NEXT