manu bhaker twitter
Sports

Manu Bhaker Dance: मनू भाकरचा काला चष्मा गाण्यावर भन्नाट डान्स; हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? VIDEO

Olympic Bronze Medal Winner Manu Bhaker Viral Dance On Kala Chashma Song: भारतीय नेमबाज मनू भाकरच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. एका कार्यक्रमात तिने काला चष्मा गाण्यावर डान्स केला आहे.

Ankush Dhavre

Manu Bhaker Indian Professional Shooter Viral Dance Video: भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारताचे इतर खेळाडू पदक मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना, एकट्या मनू भाकरने दोन कांस्यपदकं पटकावली.

दरम्यान या स्पर्धेत तुम्हाला मनू भाकरचं नेमबाजीतील कौशल्य पाहायला मिळालं. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात ती आपल्या डान्सचं कौशल्य सादर करताना दिसून येत आहे.

मनू भाकरचा हटके डान्स

मनू भाकर ही मल्टी टॅलेंटेड आहे. तिचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज येईलच. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती काला चष्मा गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही गोत्यात याल. मनू भाकर नक्की खेळाडूच आहे की अभिनेत्री? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकं जिंकणाऱ्या मनू भाकरवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. जागोजागी तिचा सत्कार केला जातोय. नुकतेच तिने तामिळनाडूतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात तिने शालेय विद्यार्थ्यांसोबत डान्स करण्याचा आनंदा लुटला. नेमबाजीत अचुक निशाणा साधणारी मनू भाकर यावेळी काला चष्मा गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ऑलिम्पिकमध्ये पटकावली २ पदकं

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मनू भाकरने (Manu Bhaker)भारताला पदकांचं खातं उघडून दिलं होतं. मनूने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात तिने सरबजोत सिंगसोबत मिळून कांस्यपदक पटकावलं होतं.

याच स्पर्धेत तिला पदकांची हॅट्रीक करण्याची संधी होती. मात्र २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात तिचं पदक थोडक्यात हुकलं होतं. या प्रकारात तिला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT