olympics yandex
क्रीडा

Paris Olympic 2024: ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील 3 मोठे रेकॉर्ड, यंदाही मोडणं कठीणच

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा बिगुला वाजला आहे. येत्या २६ जुलैला या स्पर्धेचा उद्घाटनचा सोहळा पार पडणार आहे. फ्रान्सच्या राजधानीत क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धेचा थरार पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी १०, ५०० खेळाडू मैदानात उतरणार आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही रेकॉर्ड बनवले जाणार आणि मोठे रेकॉर्ड मोडले जाणार. मात्र ३ असे रेकॉर्ड आहेत, जे यावेळीही मोडलं जाणं कठीण आहे. कोणते आहेत ते रेकॉर्ड? जाणून घ्या.

लाँग जम्प-

ऑलिम्पिकमध्ये लाँग जम्पचा रेकॉर्ड हा अमेरिकेच्या बॉब बीमॉनच्या नावावर आहे. त्याने १९६८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ८.९० मीटर लांब उडी मारली होती. हा रेकॉर्ड होऊन ५० पेक्षा अधिक वर्ष होऊन गेली आहेत .मात्र अजूनही हा रेकॉर्ड कोणलाच मोडता आलेला नाही.

उसेन बोल्टचा रेकॉर्ड

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या नावे मोठ मोठ्या रेकॉर्ड्सची नोंद आहे. बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने १०० मीटर शर्यत अवघ्या ९.६९ सेंकदात पूर्ण केली होती. १०० मीटर हे अंतर खूप कमी असतं. त्यात जगातील सर्वात वेगवान धावपटू अवतीभोवती असताना बोल्टने आधीच जल्लोष करायला सुरुवात केली होती. त्यानंतर २००९ मध्ये त्याने आपला स्वत:चा रेकॉर्ड मोडून काढला होता. मात्र इतर कोणालाही हा रेकॉर्ड मोडता आलेला नाही.

मायकल फेल्प्स

अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्सच्या नावे एका ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक मेडल्स जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. २००८ मध्ये झालेल्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्व ८ इव्हेंटमध्ये मेडल्स मिळवलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT