विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनीच अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितल्यामुळे आता महायुती असो की मविआ जागावाटपाच्य़ा चर्चेला वेग येणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या जागावाटपाचे काही निकषही अनौपचारिक गप्पांमध्ये बोलून दाखवले त्यामुळे हे निकष मित्र पक्षांना मान्य होणार का अशी चर्चा आता रंगलीय. या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हटले आहेत ते जाणून घेऊ...
यातच अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार आहे. स्ट्राइक रेट अन् जिंकण्याची क्षमता हाच निकष आहे. तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा, उमेदवारी देणार आहे. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील. विधानसभेची निवडणूक 2 टप्प्यांमध्ये होणार आहे.''
मुख्यमंत्री शिंदेंनी सर्वात महत्त्वाचा निकष मांडलाय तो लोकसभा निवडणुकीतल्या स्ट्राईक रेटचा. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ८०-९० जागा लढवण्याचा आग्रह धरलाय. तर भाजपनं निवडून येण्याच्या निकषाचा मुद्दा पुढे केलाय.
शिवसेना (शिंदे गट?
लढवलेल्या जागा 15
जिंकलेल्या जागा 07
स्ट्राईक रेट - 46 %
भाजप
लढवलेल्या जागा 28
जिंकलेल्या जागा : 09
स्ट्राईक रेट - 33 %
राष्ट्रवादी ( अजित पवार गट )
लढवलेल्या जागा 04
जिंकलेल्या जागा 01
स्ट्राईक रेट - 24 %
तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या जागावाटपातल्य स्ट्राईक रेटच्या निकणाची ठाकरे गटानं खिल्ली उडवलीय. गद्दारी आणि भ्रष्टाचारात शिंदेंचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त असून कामांचा स्ट्राईक रेट तपासा असा टोला राऊतांनी लगावलाय.
लोकसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. त्यामुळेच त्यांनी स्ट्राईक रेटचा निकष पुढे केलाय. मात्र हा निकष भाजप आणि अजितदादांच्या पक्षाला मान्य होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण शिंदेंपेक्षा भाजपचा स्ट्राईक रेट कमी आहे. तर अजितदादांच्या पक्षाचा तर लोकसभेत दारूण पराभव झालाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकष ठरले असतील तरी महायुतीचं जागावाटपाचं घोडं स्ट्राईक रेटवर अडणार एवढं मात्र नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.