Olympic Flame: ऑलिम्पिक स्पर्धेत मशाल का पेटवली जाते? वाचा हटके स्टोरी

History Of Olympic Flame: ऑलिम्पिक स्पर्धेत मशाल पेटवल्याचे तुम्ही नेहमी पाहिलं असेल. मात्र काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
olympics flame
olympic flameyandex
Published On

ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हे दर ४ वर्षांनी केले जाते. तुम्ही पाहिलंच असेल की, ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडतो, त्यावेळी मशाल पेटवली जाते. ही मशाल तोपर्यंत पेटत असते,जोपर्यंत ही स्पर्धा सुरू असते. तुम्हाला कधीतरी असा प्रश्न पडलाच असेल ना? मशाल आणि ऑलिम्पिक स्पर्धा यांचा संबंध तरी काय? का पेटवली जाते मशाल? जाणून घ्या.

olympics flame
IND vs SL, 1st T20I: पंत की सॅमसन,रिंकू की शिवम? पहिल्या सामन्यात सूर्या या 11 खेळाडूंना देणार स्थान

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार २७ जुलैपासून सुरू होणार आहे. तर २६ जुलै रोजी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मशाल पॅरिसमध्ये आणली जाणार आहे. ज्यात देशात ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे, त्यात देशात ही मशाल पोहचवली जाते. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा संपेपर्यंत ही मशाल अशीच पेटत राहते.

ऑलिम्पिक स्पर्धेत मशाल पेटवण्याला प्राचीन इतिहास आहे. ही प्रथा खूप जुनी आहे. ग्रीसमध्ये प्राचीन ऑलिम्पिक खेळांचा थरार पार पडायचा. तेव्हापासून ते आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये मशाल पेटवली जाते. यामागे लोकांची सांस्कृतिक भावना आहे.

olympics flame
Team India News: या 5 खेळाडूंची वनडे कारकिर्द जवळजवळ संपली! निवृत्तीशिवाय पर्याय नाही

मॉडर्न ऑलिम्पिक स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर १९३६ मध्ये पहिल्यांदाच मशाल पेटवली गेली होती. त्यावेळी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूला मशाल फिरविण्याचा मान दिला जायचा. १९५६ मध्ये झालेल्या उद्घाटन सोहळा हा कोणीच विसरू शकणार नाही. कारण रॉन क्लार्क मशाल घेऊन धावले असता, त्यांच्या टी शर्टला आग लागली. मात्र तरीही हे थांबले नव्हते. त्यांनी धावणं सुरूच ठेवलं.

मशाल घेऊन धावणं जरा कठीण होतं. दुर्घटना टाळण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ एडीलेडने टर्ब्यूलेंस एनर्जी कंबशन ग्रुपसोबत मिळून एक मशाल बनवली. जी कुठल्याही वातावरणात आणि कुठल्याही परिस्थितीत सातत्याने पेटत राहायची. कितीही पाऊस आला कितीही वादळ आलं तरीदेखील ही मशाल पेटतच राहते. २००० सालापासून या मशालीचा आकार लहान मोठा होत असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com