indian hockey team twitter
Sports

Paris Olympics 2024,Hockey: टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; न्यूझीलंडला ३-२ ने चारली धूळ

India vs New Zealand Hockey: भारतीय संघाने हॉकीमध्ये विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024)स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. हॉकीमध्ये भारतीय खेळाडूंनी विजयाने श्रीगणेशा केला आहे. पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand )हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय खेळाडू न्यूझीलंडच्या खेळाडूंवर भारी पडले. शेवटी भारताने हा सामना ३-२ ने खिशात घातला. या शानदार विजयासह भारतीय खेळाडूंनी पदकाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. (Hockey News In Marathi)

भारतीय कर्णधाराचा निर्णायक गोल

शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत सुरू होती. शेवटी कर्णधार हरमनप्रीत सिंगने महत्वाच्या क्षणी गोल केला आणि विजय खेचून आणला. दोन्ही संघ बरोबरीत होते. मात्र हरमनप्रीत सिंगने केलेला गोल निर्णायक ठरला. भारताकडून हरमनप्रीत सिंगसह विवेक सागर प्रसाद आणि मनदीप सिंग यांनी गोल केले. तर न्यूझीलंडकडून सिमन चाईल्ड आणि सॅम लेनने गोल केले.

पराभवाची व्याजासह परतफेड

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पार पडले आहेत. यापूर्वी २०२३ मध्ये मायदेशात खेळताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाचा बदला घेतला आहे. आता ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पराभवाचा बदला घेत विजयाने सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT