ritika hooda twitter
क्रीडा

Paris Olympics 2024: दोघींना १-१ गुण, तरीही रितिका हुडाचा पराभव! सामना गमावूनही मेडल मिळणार?

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धत भारताला आणखी एक पदक जिंकण्याची संधी होती. भारताची युवा कुस्तीपटू रितिका हुडाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ७६ किलो ग्रॅम वजनी गटातील क्वार्टर फायनलनमध्ये प्रवेश केला होता. हा सामना जिंकून तिला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र या सामन्यात तिला १-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना बरोबरीत समाप्त झाला असला, तरीदेखील विरोधी खेळाडूने शेवटचा गुण घेतला असल्याने तिला हा सामना गमवावा लागला आहे.

कुस्तीच्या या नियमामुळे रितिका हुडाचा पराभव

या प्रकारातील क्वार्टर फायनलच्या सामन्यात वर्ल्ड नंबर १ आयपेरी मेदेतचा सामना रितिका हुडासोबत पार पडला. या सामन्यात भारतीय कुस्तीपटू रितिका हुडाने शानदार सुरुवात केली. या सामन्यान रितिकाने पहिल्याच हाल्फमध्ये पॅसेविटीने १ गुण कमवला. त्यानंतर दुसऱ्या हाल्फमध्ये आयपेरी मेदेतनेही पॅसेविटीने १ गुणांची कमाई केली.

दोघांनी १-१ गुणांची कमाई केली. त्यामुळे हा सामना बरोबरीत समाप्त झाला. मात्र कुस्तीच्या नियमानुसार,आयपेरी मेदेतने शेवटचा गुण घेतला होता .त्यामुळे तिला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र तिला अजूनही पदक जिंकण्याची संधी असणार आहे. आयपेरी मेदेतने जर फायनलमध्ये प्रवेश केला. तर रितिकाला रॅपेचाज राऊंडमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे तिला कांस्यपदक जिंकण्याची संधी असणार आहे.

कोण आहे रितिका हुडा?

भारतीय कुस्तीपटू रितिका हुडा ही भारतीय नौदलात कार्यरत आहे. सध्या ती चीफ पेटी ऑफीसर हे पद सांभाळते. सध्या ७६ किलोग्रॅम वजनी गटात कुस्ती खेळणाऱ्या रितिका हुडाने वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत ७२ किलोग्रॅम वजनी गटात कांस्यपदकावर नाव कोरलं होतं.

त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या २३ वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावलं होतं. इतकेच नव्हे,चर याच वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्याने ७२ किलोग्रॅम वजनी गटातून खेळताना कांस्यपदकावर नाव कोरलं होतं.

कुस्ती सोडण्याचा घेतला होता निर्णय

रितिका हुडा ही सध्या २२ वर्षांची आहे. तिने लहानपणापासूनच कुस्तीचे धडे घ्यायला सुरुवात केली. रोहतकच्या खरकडा गावात राहणाऱ्या रितिकाने देशासाठी पदक जिंकण्याचं स्वप्नं पाहिलं. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती.

मात्र तरीदेखील तिच्या आई-वडिलांनी मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण जोर लावला. २०२२ मध्ये तिला आशियाई क्रीडा आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रवेश मिळवता आला नव्हता. त्यावेळी तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी तिची समजूत काढली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT