arjun babuta twitter
Sports

Paris Olympics 2024: अर्जुनची एक चूक अन् पदक हुकलं! रायफल शूटिंगमध्ये भारताला चौथं स्थान

Men's 10 meter Air Rifle Final Result, Arjun Babuta: फायनलमध्ये अर्जुनने शानदार खेळ केला. मात्र एका चुकीमुळे त्याला पदक मिळवता आलेलं नाही.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील तिसऱ्या दिवशीही भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी पदकांचं खातं उघडल्यानंतर भारतीय खेळाडूंना तिसऱ्या दिवशीही पदकावर नाव कोरण्याची संधी होती. मात्र १० मीटर एअर राइफल शुटींग इव्हेंटमध्ये भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. फायनलमध्ये सुरुवातीपासून शानदार कामगिरी करणाऱ्या अर्जुन बबुताला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे.

अर्जुनने फायनलमध्ये दमदार सुरुवात केली होती. त्याने १८ व्या फेरीपर्यंत टॉप ४ मध्ये आपलं स्थान कायम ठेवलं होतं. त्यानंतर ९.९ चा शॉट आल्यानंतर तो चौथ्या स्थानी सरकला. मात्र त्याने टॉप ४ मध्ये आपली जागा काही सोडली नाही.

सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत देत असलेल्या अर्जुनला शेवटी कांस्पपदक पटकावण्याची संधी होती. मात्र शेवटच्या शॉटमध्ये त्याला हवे तितके पॉईंट्स मिळवता आले नाही. त्यामुळे त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.

चीनच्या शेंग लिहाओने पटकावलं सुवर्णपदक

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल शूटींग इव्हेंटमध्ये चीनच्या शेंग लिहाओने २५२.२ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. यापूर्वी झालेल्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्यपदकावर नाव कोरलं होतं. तर स्विडेनच्या विक्टर लिंडग्रीनने रौप्य तर क्रोएशियाच्या मिरन मारिसिकने कांस्यपदक मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT