indian hockey team twitter
क्रीडा

Paris Olympics 2024: कॅप्टन हरमनप्रीतचा निर्णायक गोल! भारत- अर्जेंटिना सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय हॉकी संघातील खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी सुरु ठेवली आहे. स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी भारत आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांमध्ये हॉकीचा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी शानदार खेळ दाखवला. दरम्यान शेवटी हा सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला आहे.

भारतीय संघाने या स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात भारत आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ आमनेसामने आले. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पार पडली. भारतीय संघ या सामन्यात ५९ व्या मिनिटापर्यंत १-० ने पिछाडीवर होता. शेवटी हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरला गोल केला आणि भारताला १-१ च्या बरोबरीत आणलं.

भारतीय संघाने सुरुवातीच्या १० मिनिटात पेनल्टी कॉर्नर मिळवला होता. मात्र हा पेनल्टी कॉर्नर घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग मैदानावर नव्हता. या पेनल्टी कॉर्नरमध्ये भारताला खातं उघडण्याची संधी होती. मात्र ही संधी भारताने गमावली.

अर्जेंटिनाकडून लुकास मार्टिनेझने २३ व्या मिनिटाला गोल केला. यासह आपल्या संघाला १-० ची आघाडी मिळवून दिला. अर्जेंटिनाने आघाडी घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंवरील दबाव वाढत चालला होता. एकीकडे दबाव तर दुसरीकडे पेनल्टी कॉर्नरमध्ये मिळत असलेली संधी. मात्र भारतीय खेळाडू या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरत होते.

भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नर मिळत होता, मात्र या पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करता येत नव्हतं. ५८ व्या मिनिटाला भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. सलग ३ वेळेस अपयशी ठरल्यानंतर चौथ्या प्रयत्नात हरमनप्रीत सिंगने गोल केला आणि भारतीय संघाला बरोबरी मिळवून दिली. या गोलमुळे हातून निसटलेल्या सामन्यात भारतीय संघाने बरोबरी साधली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT