paris olympics yandex
Sports

Paris Olympics 2024 Schedule: पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सज्ज! केव्हा, कुठे अन् किती वाजता रंगणार सामने?वाचा सविस्तर

Paris Olympics 2024 Full Timetable In Marathi: भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक.

Ankush Dhavre

भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून १२४ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यादरम्यान भारतीय खेळाडूंनी ७ पदकांवर नाव कोरलं होतं. यावेळी भारताकडून ११३ खेळाडू पडकांवर नाव कोरण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. पीव्ही सिंधू, नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या पदकांचा रेकॉर्ड मोडणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही स्पर्धा केव्हा सुरू होणार, सामने कुठे खेळवले जाणार? जाणून घ्या.

  • २५ जुलै, गुरुवार

    तिरंदाजी - पुरुष वैयक्तिक रँकिंग फेरी, महिला वैयक्तिक रँकिंग फेरी ( दुपारी १ वाजता)

  • २६ जुलै, शुक्रवार

    उद्घाटन सोहळा

  • २७ जुलै, शनिवारी

    हॉकी - भारत वि. न्यूझीलंड

    बॅडमिंटन - महिला व पुरुष एकेरी साखळी फेरी, महिला व पुरुष दुहेरी साखळी फेरी

    बॉक्सिंग - पहिली फेरी ( राऊंड ऑफ ३२)

    रोईंग - पुरुष एकल स्कल हिट्स

    नेमबाजी - १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता फेरी, १० मीटर एअर रायफल पदक सामना, १० मीटर एअर पिस्तुल पात्रता फेरी

    टेबल टेनिस - महिला व पुरुष एकेरी राऊंड ऑफ ६४

    टेनिस - महिला व पुरुष एकेरी, दुहेरी प्रथम फेरी

  • २८ जुलै, रविवार

    तिरंदाजी - महिला सांघिक फेरी राऊंड ऑफ १६ ते फायनल

    रोईंग - पुरुष एकल स्कल्स रिपेचेज फेरी

    नेमबाजी - १० मी. एअर रायफल महिला पात्रता, १० मी. एअर पिस्तुल पुरुषांची अंतिम फेरी, १० मी. एअर रायफल पुरुषांची पात्रता, १० मी. एअर पिस्तूल महिला अंतिम

    जलतरण - पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक हीट्स, पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक उपांत्य फेरी, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल हीट्स, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल उपांत्य फेरी

  • २९ जुलै, सोमवार

    तिरंदाजी - पुरुष सांघिक राऊंड ऑफ १६ ते फायनल

    हॉकी - भारत विरुद्ध अर्जेंटिना (दुपारी ४:१५)

    रोईंग - पुरुष एकल स्कल्स उपांत्य फेरी

    नेमबाजी - ट्रॅप पुरुष पात्रता, १० मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता, १० मी. एअर रायफल महिला अंतिम, १० मी. एअर रायफल पुरुष अंतिम

    जलतरण - पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक अंतिम, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल अंतिम

    टेबल टेनिस - महिला व पुरुष एकेरी राऊंड ऑफ ६४ व राऊंड ऑफ ३२

    टेनिस - दुसऱ्या फेरीचे सामने

    महिला ६२ किलोग्रॅम वजनी गट उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी

  • १० ऑगस्ट, शनिवार

    ऍथलेटिक्स- पुरुष ४ बाय ४०० मीटर रिले अंतिम, महिला ४ बाय ४०० मीटर रिले अंतिम महिला भालाफेक अंतिम, पुरुष उंच उडी अंतिम, महिला १०० मीटर अडथळ्याची शर्यत अंतिम.

    बॉक्सिंग -महिला ७५ किलो, महिला ५७ किलो, पुरुष ५७ किलो, पुरुष ९२ किलो वरील फायनल

    गोल्फ - महिला चौथी फेरी

    टेबल टेनिस - पुरुष आणि महिला सांघिक पदक सामने

    कुस्ती - महिला ७६ किलो उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी, महिला ६२ किलो उपांत्य फेरी आणि पदक सामने

  • ११ ऑगस्ट, रविवार

    कुस्ती - महिला ७६ किलो उपांत्य फेरी ते पदक सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT