aman seherawat saam tv
क्रीडा

Paris Olympics, Wrestling: बंदे मे है दम! अमन सेहरावतने कुस्तीत कांस्यपदक जिंकत रचला इतिहास

Aman Seherawat vs Zelimkhan Abakarov, Wrestling Bronze Medal Match: भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात अमनने १३-५ ने बाजी मारली आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धतील ५७ किलो ग्रॅम वजनी गटातील कुस्ती प्रकारात भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहेरावत कांस्यपदकाचा सामना खेळण्यासाठी अखाड्यात उतरला होता. या सामन्यात भारताच्या युवा शिलेदाराने कांस्यपदकावर नाव कोरलं आहे. हे भारताचं पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील सहावा पदक ठरलं आहे. त्याने या सामन्यात १३- ५ ने बाजी मारली आहे. यासह तो वैयक्तिक प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

या सामन्यात अमन सेहरावतने सुरुवातीपासूनच झेलिमखान अबाकरॉववर आघाडी बनवून ठेवली होती. सुरुवातीला स्कोअर जवळपास होता. मात्र त्यानंतर अमन सेहरावतने आघाडी घेतली आणि झेलिमखान अबाकरॉवला कमबॅक करुच दिलं नाही. शेवटी हा सामना अमनने १३-५ ने आपल्या नावावर केलं.

सेमीफायनलमध्ये पराभव

अमनने शानदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. हा सामना जिंकून त्याला सुवर्ण किंवा रौप्या पदक पटकावण्याची संधी होती. मात्र या सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर अमन आणि हिगुची रेई या दोन्ही पैलवानांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल, असं वाटलं होतं. मात्र हिगुची रेईने त्याचा १०-० ने एकतर्फी पराभव केला. सामन्यातील सुरुवातीच्या काही सेकदांमध्ये हिगुची रेईने अमनवर हल्ला चढवला आणि सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दरम्यान १०-० ने आघाडी घेताच रेफ्रीने त्याला विजयी घोषित केलं.

अमन सेहरावतबद्दल बोलायचं झालं, तर त्याने प्री क्वार्टर फायनलमध्ये शानदार खेळ करुन दाखवला होता. त्याने अल्बानियाच्या पैलवानाला १२-० ने पराभूत केलं होतं. या विजयासह त्याने क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT