Manu Bhaker 
क्रीडा

Paris Olympic : भारताला आज गोल्ड मिळणार, मनु भाकेरकडे 'सुवर्ण'संधी, तिरंदाजीमध्येही दीपिका कुमारीकडून आशा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Olympic Games Paris 2024 : पॅरिस ऑलम्पिकमध्ये आठव्या दिवशी भारताला चार पदकं मिळण्याची आशा आहे. आतापर्यंत भारताने तीन पदकावर नाव कोरलेय. आठव्या दिवशी पदकांमध्ये आणखी भर (Paris Olympics 2024 Day 8) पडू शकते. नेमबाज मनु भाकेर (Manu Bhaker Gold) गहिने आतापर्यंत देशाला दोन पदके मिळवून दिली आहेत. मनु भाकेर आता 'सुवर्ण वेध' घेण्यासाठी सज्ज झाली आहे. २५ मीटर पिस्तूल अंतिम फेरीमध्ये मनु भाकेर आपलं नशीब अजमावणार आहे. आज दुपारी एक वाजता मनु भाकेर मैदानात उतरणार आहे.

दीपिका कुमारी आणि भजन कौर या तिरंदाजीमध्ये नशीब अजमावणार आहे. उप उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यासाठी आज त्या मैदानात उतरणार आहेत. हा सामना दोघांनी जिंकला तर गोल्ड अथवा कांस्य पदकावर नाव कोरु शकतात. त्यासाठी सामना जिंकून क्वालिफाय होणं अनिवार्य आहे. त्यानंतर तिसऱ्या पदकाची आशा स्कीट शूटिंगकडून असेल. अनंतजीत सिंह नरुका याच्याकडून आज भारताला पदकाची आशा आहे. (Paris Olympic Games 2024 )

अनंतजित सिंग पुरुषांच्या स्कीटच्या अंतिम फेरीत पात्र ठरला तर भारताचे पदक निश्चित होईल. एथलेटिक्समध्ये पुरुषांच्या शॉटपुटमध्ये तजिंदरपाल सिंग तूरकडून आजच्या दिवसातील चौथ्या पदकाची अपेक्षा आहे. मात्र, सुवर्ण जिंकण्यासाठी तजिंदरपाल सिंग तूरला प्रथम अंतिम सामन्यासाठी पात्र व्हावे लागेल.

Paris Olympics 2024 Day 8 Live Updates: आजचं संपूर्ण वेळापत्रक -

शूटिंग

महिला स्कीट पात्रता फेरी - रायजा ढिल्लों, माहेश्वरी चौहान - दुपारी 12:30 वाजता

पुरुष स्कीट पात्रता - अनंतजीत सिंह नरूका - दुपारी 12:30 वाजता

महिला 25 मीटर पिस्टल फायनल - मनु भाकर - दुपारी 1:00 वाजता

पुरुष स्कीट फायनल (क्वालिफिकेशनच्या आधारावर) - संध्याकाळी 7:00 वाजता.

गोल्फ

पुरुष इंडिविजुअल स्ट्रोक प्ले राउंड 3 - शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर - दुपारी 12:30 वाजता.

तिरंदाजी

महिला इंडिविजुअल राउंड ऑफ 16 - दीपिका कुमारी विरुद्ध मिशेल क्रोपेन (GER) - दुपारी 1:52 वाजता

महिला इंडिविजुअल राउंड ऑफ 16 - भजन कौर विरुद्ध डायनंदा चोइरुनिसा (INA) - दुपारी 2:05 वाजता

महिला इंडिविजुअल क्वार्टरफायनल (क्वालिफिकेशनच्या आधारावर) - सायंकाळी 4:30 वाजता

महिला इंडिविजुअल सेमीफायनल (क्वालिफिकेशनच्या आधारावर) - सायंकाळी 5:22 वाजता

महिला इंडिविजुअल कांस्य पदक सामना (क्वालिफिकेशनच्या आधारावर) - सायंकाळी 6:03 वाजता

महिला इंडिविजुअल स्वर्ण पदक सामना (क्वालिफिकेशनच्या आधारावर) - सायंकाळी 6:16 वाजता.

सेलिंग

पुरुष डिंगी रेस 5 - विष्णु सरवनन - दुपारी 3:45 वाजता

पुरुष डिंगी रेस 6 - विष्णु सरवनन - रेस 5 वाजता

महिला डिंगी रेस 4 - नेत्रा कुमानन - दुपारी 3:35 वाजता

महिला डिंगी रेस 5 - नेत्रा कुमानन - रेस 4 वाजता

महिला डिंगी रेस 6 - नेत्रा कुमानन - रेस 5 वाजता.

बॉक्सिंग

पुरुष 71 किग्रा क्वार्टर फायनल - निशांत देव वुरुद्ध मार्को अलोंसो वर्डे अल्वारेज़ - रात्री 12:18 वाजता (4 ऑगस्ट).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT