Gautam gambhir saam tv
क्रीडा

India vs Pakistan: 'पाकिस्तानचा संघही मजबूत..',भारत-पाकिस्तान सामन्याआधी गौतम गंभीरचं मोठं विधान,म्हणाला...

Ankush Dhavre

Gautam Gambhir Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने येणार आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की,'पाकिस्तानचा संघही मजबूत संघ आहे. पाकिस्तानकडेही मॅचविनर खेळाडू आहेत. भारतीय संघाला सतर्क राहावं लागणार आहे. त्यांनी १०० षटके दर्जेदार खेळ केला, तरच ते हा सामना जिंकू शकतील.'

बाबर आझमचंही केलं होतं कौतुक..

यापूर्वी गौतम गंभीरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की,' 'ज्या शैलीने बाबर आझम फलंदाजी करतो ते पाहता, माझ्या मते तो वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघासाठी ३ ते ४ शतके झळकावू शकतो.'मात्र बाबर आझमला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे. (Latest sports updates)

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळत असतो. हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत.

दोन्ही संघांचा वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ वर्ल्डकप स्पर्धेत ७ वेळेस आमने सामने आले आहेत. या सातही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे भारतीय संघ सलग आठवा विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

SCROLL FOR NEXT