Cricketer  google
Sports

Cricketer Death: बॅटिंग करताना अचानक बेशुद्ध पडला; रुग्णालयात पोहोचण्याआधीच क्रिकेटपटूचा मृत्यू

Pakistan Cricketer Died on the Field: ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एक मोठी घटना घडली. पाकिस्तानी वंशाच्या एका क्रिकेटपटूला मैदानावरच जीव गमवावा लागला. यानंतर क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे क्लब क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तानी वंशाच्या एका क्रिकेटपटूला मैदानावरच जीव गमवावा लागला. यानंतर क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियातील कॉनकॉर्डिया कॉलेजमध्ये तीव्र उष्णतेमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्लब सामन्यादरम्यान मैदानावर कोसळून क्लब स्तरावरील पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू जुनैद जफर खानचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी कॉनकॉर्डिया कॉलेजच्या मैदानावर घडली. जेथे तो ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबकडून खेळत होता. शनिवारी जेव्हा तो सामना खेळत होता तेव्हा तापमान ४१.७ अंश सेल्सिअस होते.

जुनैद अचानक जमिनिवर कोसळला

४० वर्षीय जुनैद गेल्या शनिवारी प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्धच्या सामन्यात ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करत होता. ४० ओव्हर क्षेत्ररक्षण केल्यानंतर आणि सात ओव्हर फलंदाजी केल्यानंतर तो अचानक जमिनिवर पडला. जुनैद खान रमजानमध्ये रोझा करत होता. पण आरोग्यासाठी तो दिवसभर पाणी पित राहिला.

दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये तापमान सर्वाधिक असते. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, त्यावेळी तेथील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. प्रचंड उष्णतेमुळे जुनैदचा क्रिकेट फिल्डवर मृत्यू झाला. वृत्तानुसार, जुनैद २०१३ मध्ये आयटी उद्योगात काम करण्यासाठी पाकिस्तानहून ऑस्ट्रेलियाला गेला होता.

वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला

जुनैद खान कोसळल्यानंतर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पॅरामेडिक्सनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला वाचवता आले नाही. जुनैद ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबकडून सामना खेळत होता. हा सामना ॲडलेडमधील कॉनकॉर्डिया कॉलेजमध्ये प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्ध झाला.

क्रिकेट क्लबने शोक व्यक्त केला

जुनैद खानच्या निधनानंतर, त्यांच्या क्रिकेट क्लबने शोक व्यक्त केला आणि म्हटले की, "आज कॉनकॉर्डिया कॉलेज ओव्हल येथे खेळताना झालेल्या दुर्घटनेला बळी पडलेल्या ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबच्या एका सर्वोत्तम सदस्याच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. पॅरामेडिक्सच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही. या कठीण काळात आमच्या भावना आणि मनापासून संवेदना त्याच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत आहेत.” जुनैदच्या मृत्युनंतर अति उष्णतेमध्ये क्रिकेट खेळण्याच्या धोक्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT