Asia Cup 2025 Points Table saam tv
Sports

Asia Cup 2025: पाकिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; श्रीलंका-बांग्लादेशाचं नुकसान, कोण गाठणार फायनल?

Asia Cup 2025 Points Table: सुपर-४ फेरीत पाकिस्तानने मिळवलेल्या महत्त्वपूर्ण विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. या विजयामुळे पाकिस्तानचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला असून इतर टीम्ससाठी फायनलमध्ये पोहोचण्याचे गणित (Finals Scenario) आता खूपच गुंतागुंतीचे झाले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एशिया कप 2025 सुपर-4 मधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या टीमने मंगळवारी श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह अंतिम फेरीत पोहोचण्याच्या संधी पाकने अजून बळकट केल्या आहेत. या विजयासह पाकिस्तान पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर टीम इंडिया अव्वल स्थानी आहे.

अजून कोणत्याही टीमने अधिकृतरीत्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केलेला नाही. आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात होणारा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

पाकिस्तानचा श्रीलंकेवर विजय

पाकिस्तान विरूद्ध या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना केवळ 133 रन्सपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून कामिंदु मेंडिसने अर्धशतकी खेळी केली नसती तर श्रीलंकेला 100 धावांचाही टप्पा गाठता आला नसता. 58 धावांवर श्रीलंकेची अर्धी टीम तंबूत परतली होती.

या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जबरदस्त मारा केला. शाहीन शाह आफ्रिदीने 3 विकेट्स घेतले. तर अबरार अहमदने 4 ओव्हर्समध्ये केवळ 8 रन्स देऊन 1 विकेट घेतली. हारिस रऊफ आणि हुसेन तलत यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स काढले.

लक्ष्याचा पाठलाग करताना साहिबजादा फरहान (24) आणि फखर जमान (17) यांनी पहिल्या विकेटसाठी 45 रन्सची पार्टनरशिप केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला खीळ बसली आणि 80 धावांवर पोहोचतानाच 5 विकेट्स पडल्या. श्रीलंकेच्या महिषा तिक्ष्णा आणि वंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. पण सहाव्या विकेटसाठी हुसेन तलत (32) आणि मोहम्मद नवाज (38) यांनी 58 रन्सची पार्टनरशिप करत पाकिस्तानला केवळ 12 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.

कसं आहे पॉईंट्स टेबलचं गणित

टीम इंडिया एका विजयासह पहिल्या क्रमांकावर असून आपल्याकडे 2 पॉईंट्स आहेत. तर भारताचं नेट रन रेट 0.689 आहे. पाकिस्तानची टीम श्रीलंकेवर विजय मिळवून चौथ्या वरून दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. त्यामुळे त्यांचे 2 पॉईंट्स आणि नेट रन रेट 0.226 आहे.

दुसरीकडे बांग्लादेशने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडेही 2 गुण आहेत. परंतु नेट रन रेट 0.121 असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ग्रुप स्टेजमध्ये सलग तीन विजय मिळवणारी श्रीलंका सुपर-4 मधील दोन्ही सामने गमावून जवळपास अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. त्यांचा नेट रन रेट -0.590 आहे.

भारतासाठी आजचा सामना निर्णायक

आज दुबईत भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टीमने हा सामना जिंकला तर भारत थेट एशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित होणार आहे. त्यानंतर श्रीलंका अधिकृतरीत्या स्पर्धेबाहेर जाईल आणि मग बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा विजेता दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, 'त्या' व्हिडीओमुळे ८ जणांच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Fire : कांदिवलीतल्या चाळीत अग्नि तांडव, ७ जण होरपळले, गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळे उडाला भडका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आधार कार्डशिवाय ₹१५०० विसरा, e-KYC करण्याआधी वाचा

Maharashtra Live News Update: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

SCROLL FOR NEXT