PAK vs ENG Test Match 
Sports

PAK vs ENG: पाकिस्तानमध्ये इंग्लंडने तोडला भारताचा २० वर्ष जुना विक्रम, काय होता रेकॉर्ड?

PAK vs ENG Test Match: इंग्लंडने भारताचा २० वर्ष जुना विक्रम मोडीस काढलाय. पाकिस्तानमध्ये आलेल्या एखाद्या संघाने सर्वाधिक स्कोअर बनवण्याचा विक्रम आता इंग्लंडच्या नावावर लिहिला गेलाय. इंग्लंडने भारताचा विक्रमला मोडलाय. काय रेकॉर्ड होता हे आपण जाणून घेऊ.

Bharat Jadhav

पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजाची जबर धुलाई होत आहे. मुलतान क्रिकेट स्टेडियमच्या सपाट खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून विक्रम होत आहेत. पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत, तर इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी द्विशतके झळकावलीत. या सामन्यादरम्यान इंग्लंडने भारताचा २० वर्ष जुना विक्रम मोडीत काढलाय. पाकिस्तानमध्ये पाहुण्या संघाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता.

भारताने याच मैदानावर २००४ पाच विकेट गमावत ६७५ धावांवर आपला डाव घोषित केला होता. याच कसोटी सामन्यात विरेंद्र सहेवागने ट्रिपल सेंचुरी केली होती. तर सचिन तेंडुलकर १९४ धावा करत नाबाद राहिला होता. मुल्तान कसोटीमध्ये इंग्लंडने पहिल्या डावात ७ विकेट गमावत ८२३ धावांवर आपला डाव घोषित केला होता.

पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडच्या मुल्तान कसोटी सामन्याच्या चौथा दिवस आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत नसल्याचं दिसून येत आहे. हे पाहता कसोटी सामना अनिर्णीत राहिल असे वाटते. दरम्यान पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५५६ धावा केल्या. कर्णधार शान मसूदने सर्वाधिक १५१ धावा केल्या. तर आगा सलमानने १०४ धावा केल्या तर अब्दुल्ला शफीकने १०२ धावा केल्या. तर आगा नाबाद परतला.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार ऑली पोप खातेही न उघडता बाद झाला, पण यानंतर इंग्लिश फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. त्यामुळे सुरुवातीला आनंदाने टाळ्या टिपणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंना इंग्लिश फलंदाजांचे फटके खावे लागले.

जो रूटने ३७५ चेंडूंमध्ये २६२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने इंग्लंडकडून अनेक विक्रम केले. यामध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रमचा समावेश आहे. या खेळीत रूटने २० हजार आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने ७८ तर बेन डकेटने ८४ धावा केल्या. हॅरी ब्रूकने त्रिशतक झळकावले तो ३१७ धावा करून बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT