Pakistan vs Srilanka, Asia Cup 2023 Match: Saam tv
Sports

ICC Team Rankings: तेलही गेलं तूपही गेलं! श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाने फायनल हुकली; आता टीम इंडियाने दिला मोठा धक्का

Pakistan vs Srilanka, Asia Cup 2023 Match: या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

ICC Team Rankings:

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला. या रोमांचक सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.

आता अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या पराभवानंतर पाकिस्तान संघाला आणखी मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानचा संघ वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी घसरला आहे. तर भारतीय संघाने दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. पाकिस्तानचा संघ ३१०२ पॉइंट्स आणि ११५ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

तर पाकिस्तानच्या पराभवाचा भारतीय संघाला फायदा झाला आहे. भारतीय संघ ४५१६ पॉइंट्स आणि ११६ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३०६१ पॉइंट्स आणि ११८ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे.

या यादीत गतविजेता इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी तर उपविजेता न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानी कायम आहे.

पराभवाचा फटका...

सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २५२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने २ गडी राखून हा सामना जिंकला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा २३८ धावांनी धुव्वा उडवला होता. २ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत - पाकिस्तान सामना पावसामुळे धुतला गेला होता.

बांगलादेशला धूळ चारल्यानंतर सुपर -४ मध्ये पाकिस्तानला भारतीय संघाकडून २२८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आता श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे नंबर १ स्थान गेलं आहे. (Latest sports updates)

रोमांचक सामन्यात श्रीलंका विजयी...

हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होणार होता. मात्र पाऊस पडल्याने हा सामना ५ वाजून १५ मिनिटांनी सुरू झाला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. ४२ षटक अखेर पाकिस्तानने ७ गडी बाद २५२ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक ९१ धावा केल्या. तर असलंकाने नाबाद ४९ धावा करत संघाला सामना जिंकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : खडकवासला धरण, कात्रज बोगदा ते तथाकथित पुणेकरांनी दिलेला त्रास; शरद पवार महात्मा फुलेंवर काय म्हणाले?

Onion Chutney Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा कांद्याची चटकदार चटणी, सिंपल रेसिपी आताच वाचा

Adult Star Passes Away: एडल्ट स्टार काइली पेजचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन; ड्रगमुळे मृत्यू झाल्याचा संशय

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

SCROLL FOR NEXT