Pakistan cricket team saam tv
Sports

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्वी मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Pakistan England Test series: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात मोठे बदल केले आहेत. सात खेळाडूंना रिलीज करून त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कोचिंग स्टाफमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने टेस्ट संघातील तब्बल सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी सात खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. PCBच्या या मोठ्या फेरबदलामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

PCB ने मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, अली उस्मान, आमिर जमाल, मुहम्मद अवैस जफर आणि खुर्रम शहजाद यांना टीममधून रिलीज केलं आहे. म्हणजेच हे खेळाडू आता इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये पाकिस्तानकडून खेळणार नाहीत.

मुख्य कोच आणि गोलंदाजी प्रशिक्षकालाही हटवलं

फक्त खेळाडूंच्याच बाबतीत बदल करण्यात आलेले नाहीत तर पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्येही मोठे फेरबदल झालेत. मुख्य कोच सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी माइक हेसन यांची मुख्य कोच आणि एश्ले नॉफ्के यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

पहिल्या दोन टेस्टमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव

इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये पहिल्या दोन टेस्ट हेडिंगली आणि लॉर्ड्समध्ये खेळवल्या गेल्या. या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर PCB ने संघात हे मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. सिरीजमधील तिसरी आणि शेवटची टेस्ट 9 सप्टेंबरपासून बर्मिंघममध्ये खेळवली जाणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या टीममध्ये सात नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय.

नव्या संघात साइम अयूब, अब्दुल्ला फजल, अराफात मिन्हास, साद बेग, मुहम्मद रंधावा, रजाउल्लाह आणि मुहम्मद इमरान ज्युनियर यांना संधी देण्यात आली आहे.

सातपैकी पाच खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय अनुभव

या सात नव्या खेळाडूंपैकी पाच जण पाकिस्तानकडून यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. मात्र, मुहम्मद रंधावा आणि रजाउल्लाह यांनी अद्याप पाकिस्तानचं कोणत्याही स्तरावर प्रतिनिधित्व केलेलं नाही. साइम अयूबने पाकिस्तानकडून आठ टेस्ट सामने खेळलेत तर अब्दुल्ला फजलने दोन टेस्ट सामने खेळलेत.

डावखुरा फिरकी गोलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडू अराफात मिन्हासने पाकिस्तानकडून तीन वनडे आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. याशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इमरान ज्युनियर, विकेटकीपर-फलंदाज साद बेग आणि उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर खेळाडू मोहम्मद इमरान यांनाही टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

साद बेगने 2025-26 च्या कायद-ए-आजम ट्रॉफीमध्ये ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार मिळवला होता. मुहम्मद रंधावा आणि रजाउल्लाह यांचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू बर्मिंघममध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टपूर्वी पाकिस्तानच्या टीममध्ये दाखल होतील.

पाकिस्तानची खराब कामगिरी

इंग्लंडविरुद्ध हेडिंगली आणि लॉर्ड्समध्ये झालेल्या पहिल्या दोन टेस्ट गमावल्यानंतर पाकिस्तानची परदेशातील कामगिरी आणखी खराब झालीये. रविवारी लॉर्ड्सवर झालेला पराभव हा पाकिस्तानचा गेल्या 11 परदेशी टेस्ट सामन्यांमधील तब्बल दहावा पराभव ठरलाय. एवढंच नाही तर गेल्या 20 टेस्ट सामन्यांमध्ये पाकिस्तानचा हा 15वा पराभव होता.

या खराब कामगिरीचा परिणाम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलवरही दिसतोय. पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे 16.67 टक्के गुणांसह पाकिस्तान गुणतालिकेत सध्या सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.

बर्मिंघम टेस्टसाठी पाकिस्तानची टीम

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अराफात मिन्हास, अजान अवैस, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मुहम्मद इमरान, मोहम्मद इमरान ज्युनियर, मुहम्मद गाजी गोरी, रजाउल्लाह, साद बेग (विकेटकीपर), साइम अयूब, साजिद खान, सऊद शकील, शान मसूद आणि उबैद शाह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही 5 लक्षणं, हार्ट अटॅक येण्यापूर्वी धोका ओळखा

ठाकरे की शिंदे...शिवसेना कुणाची? 'सर्वोच्च' सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीत मुक्काम, मोठी अपडेट समोर

Beetroot juice: या 3 लोकांसाठी बीटाचा ज्यूस म्हणजे जणू विष! प्यायलात तर पडेल महागात

Skincare Tips for Men and Women: सुंदर दिसण्यासाठी महिला आणि पुरुषांनी फॉलो कराव्यात ‘या’ 5 सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार

SCROLL FOR NEXT