आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धा सुरु असून या स्पर्धेमध्ये मध्ये भारतीय हॉकी टीमने विजयी मालिका सुरू ठेवलीये. शनिवारी चीनमधील हुलुनबुरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा दारूण पराभव केला. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन्ही गोल केले. याशिवाय पाकिस्तानकडून एकमेव गोल अहमद नदीमने केला.
या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चांगला संघर्ष पहायला मिळाली. या सामन्यात पहिल्या सात मिनिटांमध्ये पाकिस्तानने आघाडी घेतली होती. पाकिस्तानने भारताचा गोलकीपर कृष्ण बहादुर पाठकला चकमा देत पहिला गोल केला. यावेळी पाकिस्तानकडे १-० अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर भारताने त्यांना संधी दिली नाही.
यानंतर अवघ्या ६ मिनिटांच्या अंतराने टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नर वर गोल करत स्कोर समान केला. यानंतर दुसरा क्वार्टर टीम इंडियाच्या नावे राहिला. दुसऱ्या क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटाला भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. १९व्या मिनिटाला जुगराज सिंगने सर्कलवरून चेंडू हरमनप्रीतकडे सोपवला अन् कर्णधाराने या संधीचं देखील सोनं केलं. यावेळी भारताने २-१ अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला आगेकूच करता आली नाही. २८व्या मिनिटाला नदीमने भारताच्या गोटात चिंता निर्माण केली होती. मात्र तो गोल थोडक्यात हुकला. मात्र, पुढच्या मिनिटाला त्याने टीमला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. मात्र यावेळीही चेंडू गोलपोस्टच्या बारवर लागल्याने बरोबरीची संधी हुकली.
चौथ्या क्वार्टरमध्ये बरोबरी साधण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर होतं. भारताने सुरुवातीच्या चार मिनिटांत पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु पाकिस्तानने चांगला खेळ करत त्याचा बचाव केला. यावेळी भारताचा तिसरा गोल थोडक्यात होताना राहिला. दोन्ही टीम्समध्ये शाब्दिक भांडणही झाल्याचं दिसून आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.