indian cricket team saam tv
Sports

T20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाला पाकिस्तानकडून वॉर्निंग, नेमकं काय आहे प्रकरण?

भारताला वर्ल्डकपमध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, कारण...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरोधात होणार असल्याने भारतीय चाहत्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मात्र, त्याआधी (Pakistan) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम आक्रमने टीम इंडियाला सल्ला देतानाच वॉर्निंग दिली आहे. (Indian Cricket Team latest News Update)

भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने म्हटलंय की, टीम इंडियात कुणीही वेगवान सुपरस्टार गोलंदाज नाहीय. त्यामुळं भारताला वर्ल्डकपमध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागेवर उमरान मलिकची निवड केली पाहिजे.

वेगवान गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियात होतो फायदा

पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम म्हणाला, भारतीय क्रिकेट संघात भूवनेश्वर कुमार आहे. तो नव्या चेंडूनं भेदक गोलंदाजी करतो. पण त्याच्याकडे गोलंदाजीचा वेग फारसा नाहीय. जर चेंडूनं स्विंग केला नाही तर भूवनेश्वरला खूप मेहनत घ्यावी लागेल. भूवनेश्वर एक चांगला गोलंदाज आहे, यात काही शंका नाही. परंतु, ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजीचा फायदा अधिक होतो.

अक्रम पुढे म्हणाला, भारतीय संघात खूप चांगली बॅटिंग लाईन अप आहे. पण संघात अजूनही बुमराहच्या जागेवर रिप्लेसमेंट केली नाहीय. पाकिस्तान टीमचा मिडल ऑर्डर खूप खराब आहे. त्यामुळे पाकिस्तान अडचणीत येऊ शकतो. जर मिडल ऑर्डर ठीक केलं, तर पाकिस्तानकडे चांगले गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज आहेत. जर त्यांनी मिडल ऑर्डर चांगली केली, तर त्यांच्याकडे एक संधी आहे.

'टीममध्ये उमरानचा समावेश करायला पाहिजे'

उमरान मलिकबाबत बोलताना अक्रम म्हणाला, तुम्ही त्या खेळाडूला पाहिलं आहे? उमरान मलिक... त्याची गोलंदाजी वेगवान आहे. तो आर्यलॅंड दौऱ्यावर गेला होता. पण त्याला गोलंदाजीत यश मिळालं नाही. पण, टी20 फॉर्मेटमध्ये असं घडत असतं. टीम मॅनेजमेंटला त्याच्यासोबत राहावं लागेल. जर मी टीम इंडियाच्या थिंक टॅंकमध्ये असतो, तर उमरानला नेहमी टीमसोबत ठेवलं असतं. टी20 फॉर्मेटमध्ये अनुभव महत्वाचा असतो. उमरानमध्ये 150kph पेक्षा अधिक वेगानं चेंडू फेकण्याची क्षमता आहे.

शामी, सिराज आणि शार्दुल टीम इंडियात

मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजला आज 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात पोहचायचं आहे. या तिघांपैकी एकाला बुमराहच्या जागेवर रिप्लेस केलं जाऊ शकतं. बुमराहच्या जागेवर शमीला संधी मिळण्याची चर्चा आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या, आर. अश्विन,युजवेंद्र चहल,अक्षर पटेल,भुवनेश्वर कुमार,हर्षल पटेल,अर्शदीप सिंह.

स्टॅंडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT