नवी दिल्ली : टी20 वर्ल्डकप 2022 आधी टीम इंडियाची सराव सामन्यांतून जोरदारी तयारी सुरू झाली आहे. टीम इंडिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला गोलंदाजांनी 8 विकेट्स घेवून 168 धावांवर रोखलं. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने गिअर बदलून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली होती. मात्र, आश्विनच्या (Ravichandran Ashwin) फिरकीने फलंदाजांना आक्रमक खेळी करण्यापासून रोखलं. आश्विनला दुसऱ्या सराव सामन्यात बेस्ट बॉलरनं सन्मानित करण्यात आलं. त्याने चार षटकात 32 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. (Greatest bowling spell of Ravichandran Ashwin)
पहिल्या तीन षटकांमध्ये आश्विनने अचूक टप्प्यावर गोलंदाजी न केल्याने तीन षटकांत 30 धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात आश्विनने संपूर्ण खेळच पालटला. आश्विनने या षटकात 2 धावा देऊन तीन विकेटस् घेतल्या. आश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. त्याच्याकडे हॅट्रिक घेण्याची संधी होती. मात्र, आश्विनची हॅट्रिकची संधी हुकली. पण चौथ्या चेंडूवर विकेट घेण्यात त्याला यश आलं.
या दमदार कामगिरीमुळं आश्विनने वर्ल्डकपच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याची जागा निश्चित केल्याचं कळतं आहे. मात्र, युजवेंद्र चहलच्या जागेवर आश्विनला प्लेईंग इलेव्हनमध्ये घेणं कठिण आहे. पण तरीही त्याने धमक दाखवून दिली आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट कशा प्रकारे आश्विनकडे पाहताता, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
हर्षलनेही केली चमकदार कामगिरी
पहिल्या सराव सामन्यात अपयश मिळालेल्या हर्षल पटेलने दुसऱ्या सराव सामन्यात पुनरागमन केलं. हर्षलने चार षटकात 27 धावा देऊन 2 विकेटस् घेतल्या. त्याशिवाय अर्शदीप सिंहने 3 षटकात 25 धावा देऊन एक विकेट घेतली. अर्शदीपने पुन्हा एकदा पहिल्या षटकात विकेट घेतली. भुवनेश्वर, हार्दिक, हुड्डा आणि अक्षर पटेल एकही विकेट नाही भेटली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.