Shoaib Akhtar And Umran Malik saam tv
Sports

माझा विक्रम मोडण्याच्या नादात हाडं मोडू नको; शोएब अख्तरचा 'या' गोलंदाजाला सल्ला

भारताचे नवोदीत खेळाडू यंदाच्या आयपीएल हंगामात मिळालेल्या संधीचं सोनं करताना दिसत आहेत.

नरेश शेंडे

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) एकाहून एक चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. भारताचे नवोदीत खेळाडू यंदाच्या हंगामात मिळालेल्या संधीचं सोनं करताना दिसत आहेत. जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) त्यापैकीच एक आहे. सनारायजर्स हैद्राबादसाठी (Sunrisers Hyderabad) खेळणाऱ्या उमरानने १५० केपीएचपेक्षाही अधिक वेगानं गोलंदाजी करत अनेक दिग्गज खेळाडूंच्या यष्ट्या उडवल्या आहेत. नुकतंच उमराने १५७ केपीएचा चेंडू फेकून आयपीएलच्या इतिहासात नोंद केलीय. दिवसेंदिवस गोलंदाजीत भेदक कामगिरी करणारा उमरानची चर्चा संपूर्ण क्रिकेटविश्वात होत आहे. दरम्यान, उमरानच्या वेगवान गोलंदाजीमुळं पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्याही (Shoaib Akhtar) भुवया उंचावल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएबने सर्वात वेगात चेंडू फेकण्याचा विक्रम केला होता. परंतु, यंदाच्या आयपीएलमध्ये उमरानची कामगिरी पाहता आपल्या नावावर असलेले विक्रम मोडण्याची भीती शोएबला वाटत आहे. याबाबत शोएबने माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या २० वर्षांपासून माझा विक्रम मोडला नाही : अख्तर

उमरान मलिकवर बोलताना अख्तर म्हणाला, उमरानला क्रिकेटमध्ये दिर्घकाळ खेळताना पाहायचा आहे.माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमाला २० वर्षे पूर्ण झाल्याने मला नुकतचं कुणीतरही शुभेच्छा दिल्या होत्या. माझा विक्रम अजूनही मोडला गेला नाही. यावर बोलताना मी म्हणालो, हा विक्रम मोडला पाहिजे. कुणीतरी तरुण गोलंदाजाने माझा विक्रम मोडायला पाहिजे. जर उमरानने माझा विक्रम मोडला तर मला जास्त आनंद होईल. पण विक्रम मोडता मोडता हाडे मोडून घेवू नये. उमरानने नेहमी तंदुरुस्त राहावं. त्याने जखमी होऊ नये. अशी मी प्रार्थना करतो.

उमरानने १०० MPH ने गोलंदाजी केली, तर....

आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी उमरान मलिकची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना अख्तर म्हणाला, उमरानला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. उमरान खेळताना मला पाहायचं आहे. १५० केपीएचच्या वर गोलंदाजी करणारे खूप कमी खेळाडू पाहिले आहेत. उमरान सतत १५० केपीएचच्यावर गोलंदाजी करत आहे. हे पाहून मला आनंद झाला आहे. जर त्याने १०० MPH वेगात गोलंदाजी केली तर मला खूपच आनंद होईल. फक्त त्याने खेळताना जखमी होऊ नये जेणेकरुन त्याच्या करियरवर काही परिणाम होणार नाही. शोएब अख्तरच्या नावावर १६१.३ केपीएच्या वेगात चेंडू फेकण्याचा विक्रम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये भाजप-शिवसेना युती; सूत्रांची माहिती

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकारणात पडद्यामागं मोठी घडामोड|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT